गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दिवसेंदिवस शरीराविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ होत असल्याने तसेच आगामी साजरे होणाऱ्या उत्सवाच्या अनुषंगाने मा.पोलीस आयुक्त सो व मा. पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर यांनी तडीपार/पाहिजे/फरार आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते.
अनुषंगाने आज रोजी इकडील अधिकारी व स्टाफ असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत मंतरवाडी चौक जवळ स्टाफ थांबला असता स्टाफ मधील पो.हवा.५५ खरपुडे व पो.ना.६४६९ जाधव यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, अमोल शिवाजी माने हा खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये फरार असून तो मंतरवाडी चौकाजवळ उभा असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती मा.पोनि सुनील पंधरकर सो, यांना कळविले असता त्यांनी सदर बातमीची योग्य ती खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
प्राप्त बातमीच्या अनुषंगाने वरील स्टाफ हा सदर ठिकाणी गेल्यानंतर वरील वर्णनाचा इसम हा मिळून आल्याने स्टाफने त्यास ताब्यात घेऊन त्यास पुढील अधिक चौकशी करिता इकडील कार्यालयात आणून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता अमोल शिवाजी माने, वय ३२वर्ष, रा. ढोले वस्ती ,ऊरूळी देवाची,पुणे
असे असल्याचे सांगितले.त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो स्वारगेट पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ११५/२०२२, भा.दं.वि. कलम ३०७,४२७,५०४,५०६,३४ सह १३५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ४(२५) या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे समजले.
त्यास पुढील कारवाईकरिता स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे,मा.श्री. श्रीनिवास घाडगे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर लोखंडे,मनोज खरपुडे, विनायक येवले,सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव यांनी केली आहे.
सुनील पंधरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad