विमानतळ पोलिसांची कामगिरी गुन्हा दाखल झाल्यापासुन ०८ तासात शिताफिने ताब्यात.

ACS POLICE CRIME SQUAD

प्रेसनोट ता . २६ / ११ / २०२१ “ मित्रास मारहान का केली , याचा जाब विचारल्याने , तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार गुन्हेगारांना विमानतळ पोलीसांनी केले जेरबंद ” ACS POLICE CRIME SQUAD

इसम नामे विनायक ऊर्फ भैय्या क्षिरसागर वय २० वर्षे हे विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत एस आर ए बिल्डींग विमाननगर पुणे येथे राहावयास आहेत , त्यांचा मित्र करण हेळकर यास यापुर्वी सोहेल याचे वडीलांनी मारहाण केली म्हणुन विनायक याचा मित्र साईनाथ पाटोळे हा करण हेळेकर यास का मारहाण केली म्हणुन आरोपी सोहेल याचे वडीलांना जाब विचारणेसाठी गेला असता त्यांचे मध्ये बाचाबाची झाली होती . त्या रागातुन आरोपी

१ ) सोहेल मुल्ला व त्याचे तीन साथीदार

२ ) सिध्दार्थ कांबळे रा मंगळवार पेठ पुणे

३ ) सिध्दार्थ रजपुत वय १९ वर्षे रा बुधवार पेठ पुणे

व विधीसंघर्षीत बालक अमीन शेख रा एस आर ए बिल्डींग विमाननगर पुणे

यांनी फिर्यादी व त्याचे दोन मित्र फिरोज कुतुब खान व प्रतिक शिवाजी खंडागळे रा . एस . आर . ए . बिल्डींग पुणे हे दिनांक २२/११/२०२१ रोजी रात्री ११/३० वा चे सुमारास एस आर ए बिल्डींग नंबर डी चे खाली पार्किंग जागेत मोबाईलवर पब्जी खेळत बसले असताना त्यांना कोयत्यासारखे लांब धारदार हत्याराने व सिंमेंटचे ब्लॉकने मारहान व जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे , म्हणुन विमानतळ पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे भां द वि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . आरोपी गुन्हा केल्यानंतर सदर ठिकाणाहून परागंदा झाले होते . परागंदा झालेल्या आरोपीतांचा विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक शोध घेत असताना सदर आरोपींबाबत तपास पथकातील अंमलदार पोना २२९७ सचिन जाधव यांना सदरचे आरोपी हे डी . वाय पाटील कॉलेज शेजारी असलेल्या टेकडीजवळ लपुन बसले असले बाबत बातमी मिळाली होती . बातमीप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री . सचिन जाधव पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील स्टाफने यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना सापळा लावुन गुन्हा दाखल झाल्यापासुन ०८ तासात शिताफिने ताब्यात घेतलेले आहे .

सदरची कारवाई ही मा . श्री . नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर , मा . श्री . रोहिदास पवार , पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर , श्री किशोर जाधव सहा . पोलीस आयुक्त ,

येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पोउपनिरी सचिन जाधव पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे , गणेश साळुंखे सचिन जाधव , रुपेश पिसाळ , हरुण पठाण , विनोद महाजन , गिरीष नाणेकर , अंकुश जोगदंडे , शिवराज चव्हाण , नाना कर्चे यांचे पथकाने केली आहे .

भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे पुणे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *