कंबरेस पिस्टल लावुन फिरणा या रेकॉर्डवरील गुन्हेगार ला पोलिसांनी केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – २५/११/२०२१ – खडक पोलीस स्टेशन , पुणे शहर कंबरेस पिस्टल लावुन फिरणा – या सराईतास तपास पथकाने ठोकल्या बेडया .

दिनांक २३/११/२०२१ रोजी खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनला हजर असतांना पोलीस अंमलदार संदिप तळेकर व रवी लोखंडे यांना गुप्त बातमीदारा व्दारे बातमी मिळाली की , खडक व कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार वसिम ऊर्फ लाल हजारी रा . लोहियानगर पुणे हयाचे कंबरेला एक पिस्टल असुन तो महात्मा फुले पेठ , विराणी स्टील दुकान नेहरु रोड पुणे येथे थांबलेला आहे . सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांना सांगितली . त्यांनी योग्य ती काळजी घेवुन बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या . त्यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार यांचेसह बातमीच्या ठिकाणी महात्मा फुले पेठ , विराणी स्टील दुकान नेहरु रोड पुणे येथे जावुन खात्री करता रेकॉर्डवरील गुन्हेगार वसिम ऊर्फ लाल हजारी हा पोलीसांना दिसुन आल्याने त्यास झडप घालुन पकडण्यात आले . वसिम ऊर्फ लाल हजारी यास पुर्ण नाव / पत्ता.

विचारता त्याने त्याचे नाव वसिम ऊर्फ लाल रशीद हजारी वय ३८ वर्षे रा . घर नंबर ५५ , ५४ / सी पी / लोहियानगर पुणे

असे सांगितले , त्याची अंगझडती घेता त्याचे कंबरेस मागील बाजुस ३५,००० / – रु किंमतीचे ०१ गावठी पिस्टल व ३,००० / – रु किं चे ०३ जिवंत काडतुसे मिळुन आले

असुन त्याचेवर खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

सदर गुन्हयाचा तपास राहुल खंडाळे , पोलीस उप निरीक्षक खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत . अटक आरोपी याचे पुर्वीचे रेकॉर्ड पाहता त्याचेवर बेकायदेशीर जमाव जमवुन मारमारी करणे अशा स्वरुपाचे २ गुन्हे दाखल आहेत .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , श्री राजेंद्र डहाळे , मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ.प्रियंका नारनवरे , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . सतिश गोवेकर , मा . सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली .

खडक पोलीस स्टेशन चे श्री . श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्री राहुल खंडाळे , विक्रम मिसाळ , पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग , फहिम सैय्यद , संदिप पाटील , संदिप तळेकर , रवी लोखंडे , राहुल मोरे , हिंमत होळकर , कल्याण बोराडे , विशाल जाधव , सागर घाडगे यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *