मंदिर व दर्गाह मध्ये चोरी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद.
ACS POLICE CRIME SQUAD
गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी
मंदिर व दर्गाह मध्ये चोरी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद.
२६/११/२०२१, ACS NEWS
पुणे शहरामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होत असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारा वर पाळत ठेवण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक २६/११/२०२१ रोजी सहा पोलीस निरीक्षक वैशाली भोसले पो हवा रेनुसे पो हवा ३६४ ,वग्गु पोना ७३८३ महाजन, पोशि कादिर शेख पोशि ८१३६ जाधव असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग फिरत फिरत कात्रज चौक येथे आलो असता पोलीस अंमलदार पो हवा रेणुसे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखा वरील चोरी करणारा इसम नामे खाशिमआली बाबुलाल शेख हा केदारेश्वर मंदिर खोपडेनगर भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमीचे ठिकाणी जाऊन गुप्तपणे पाहणी करत असताना मिळालेल्या वर्णनाचे इसम दिसून आला.त्याला ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे खाशिम आली बाबुलाल शेख वय २१ रा. जाधव नगर गुजरवाडी कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले त्यांला ताब्यात घेऊन त्यास कार्यालयात आणून त्यांचे कडे अधिक चोकशी केली असता त्याने मंदिर व दर्ग्यामध्ये चोरी केले बाबत सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने खालील ठिकाणी मंदिरमधील तसेच दर्ग्यामध्ये चोरी केल्याचे कबूल केले आहे.
१. वाघजाई माता मंदिर – वाघजाईनगर
२. शंकर मंदिर – खोपडेनगर
३. दर्गा – खोपडेनगर
४. दत्त मंदिर – दत्तनगर कात्रज
५. गणपतीमंदिर – जाधव नगर कात्रज
६.भैरवनाथमंदिर – आंबेगाव गावठाण
७. आशापुरा मदिर – बिबवेवाडी अशा प्रकारे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांचेकडून एकूण १६१००//- रोख रक्कम तसेच ०१ स्टील ची दानपेटी ०१ पितलेची घंटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचे सोबत त्याचे इतर साथीदार नामे १)प्रणव दिघांबर अडसूळ २)सुनील लक्ष्मण पवार यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडून खालील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) भारती विद्यापीठ पोस्टे गुरनं ७५६/२०२१ भादवि ३८०,४५७
२) भारती विद्यापीठ पोस्टे गुरनं ६६९/२०२१ भादवि कलम ३८०,४५७
३) भारती वद्यापीठ पोस्टे
गुरनं ७६२/२०२१ भादवि ३८०,४५७
४) बिबवेवाडी पो स्टे. /२१ भा द वी ३८०,४५७
अशा प्रकारे गून्हे उघड करण्यात आलेले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.श्री. पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, मा.श्री. श्रीनिवास घाडगे , पोलीस उपायुक्त गुन्हे, मा.श्री. बोराटे , सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा.श्री. क्रांतिकुमार पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, Unit-2, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स पो नि वैशाली भोसले , स पो आंब्रे,पोलीस अंमलदार रेणूसे किशोर वग्गु,चंद्रकांत महाजन, निखिल जाधव,कादिर शेख, यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526