विमानतळ :तपास पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एकजण गावठी पिस्टलसह ताब्यात : २ जिवंत काडतुसे हस्तगत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे, दि.२६ नोव्हेंबर
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

विमानतळ तपास पथकाकडून धडाकेबाज कामगिरी.

पुणे शहर आयुक्तालयात वाढत असलेल्या गोळीबाराच्या घटना रोखणे पोलीसांसाठी आव्हान ठरत असतानाच विमानतळ पोलीसांकडून एका इसमावर गावठी पिस्टल व २ जिवंत काडतूसे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. विमानतळ तपास पथकाकडून अग्नी शस्त्रांच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून अवैध पिस्टल हस्तगत करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

दि.२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप , उपनि रविंद्र ढावरे व तपास पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पो.ना. गिरिष नाणेकरव सचिन जाधव यांना गोपनिय माहिती मिळाली की, खुळेवाडी कॉर्नर पुणे नगर रोड येथे मोकळ्या मैदानात एक इसम पिस्टल घेवून थांबला आहे. सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी कारवाईचे आदेश देताच तपास पथकातील उपनि रविंद्र ढावरे व कर्मचारी यांनी सापळा लावून .

आरोपी संतोष शंकर गुंजाळ वय-२६, रा.दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर यास ताब्यात घेवून त्याच्याकडील ५०,२००/- किंमतीचे १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतूसे जप्त केली. सदरबाबत विमानतळ येथे गुरनं.४५०/२०२२ शस्त्र अधिनियम कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा.पो.फौ.अविनाश शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त-४ शशिकांत बोराटे, सहा.पो.आयुक्त सौ.आरती बनसोडे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, मंगेश जगताप (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली उपनि रविंद्र ढावरे, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, संजय आसवले यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *