लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा चा छापा,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे,दि.२६ :- पुणे शहरांतील लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.

दोन ठिकाणी छापा कारवाई करुन २० जणांना ताब्यात घेऊन ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सामाजिक सुरक्षा विभागाला सोमवारी (दि.२१) लोणी काळभोर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली.

पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी १० जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण ४६ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला सोमवारी (दि.२१) लोणी काळभोर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी १० जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण ४६ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तसेच गुरुवारी (दि.२४) विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार व पणती पोकळी सोरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला.यावेळी जुगार खेळत आणि खेळवत असलेल्या १० जणांना ताब्यात घेऊन ३१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील,अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने,इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *