पुण्यातील चिखली पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर लाच स्वीकारताना अँटी करप्शन ची कारवाई,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे :चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पुण्यातील चिखली पोलीस येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर लाच स्वीकारताना अँटी करप्शन ची कारवाई,
नरेंद्र लक्ष्मण राजे, वय ५४ वर्ष, पद सहायक पोलीस उपनिरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे.
पिंपरी-चिंचवड १७/१२/२०२३,(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
अपघातातील गाडी परत करण्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लक्ष्मण राजे (वय-54) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.17) चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली.
थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झालेला असून, सदरबाबत चिखली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७९९/२०२३, भा.दं. वि. कलम २७९, ४२७, मो.व्हे. अॅक्ट कलम १८५, १८४, ११९/११७ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोकसेवक सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र राजे हे करीत होते. सदर अपघाताच्या गुन्ह्यातील तक्रारदार यांची गाडी त्याना परत करण्यासाठी लोकसेवक नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांचेकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती १,००,०००/- रुपये (एक लाख) रुपये ठरले. त्यांपैकी लोकसेवक नरेंद्र राजे यानी तक्रारदार यांचेकडून दि. १३/१२/२०२३ रोजी १५,०००/- रुपये व दि. १५/१२/२०२३ रोजी ५५,०००/- रुपये स्विकारले असून, उर्वरित रक्कमेची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यानी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता,आरोपी लोकसेवक नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे अपघातातील वाहन परत करण्यासाठी उर्वरित रक्कमेपैकी २०,००००/- रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष मागणी करुन, लोकसेवक नरेंद्र राजे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये २०,०००/- (विस हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. लोकसेवक नरेंद्र राजे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना नरेंद्र राजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नरेंद्र राजे यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

सदरची कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव,पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, सुराडकर,चव्हाण यांच्या पथकाने केली.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in