शिधा पत्रीका चालु करण्यासाठी खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
Anti-corruption department action against private IS for launching ration card
(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान, ९८२२३३१५२६
शिधा पत्रीका पुर्ववत करण्यासाठी व अन्न धान्य पुरवठा चालु करण्यासाठी मध्यस्थी करणा-या खाजगी इसमावर लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मागणी प्रकरणी कारवाई केली आहे.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, व गुन्हा नोंद क्रमांक कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अ.
आरोपीचे नाव शंकर शिवाजी क्षिरसागर, वय ३२ वर्ष, रा. राजीव गांधी नगर, पुणे. (खाजगी इसम) मागणी केलेली लाचेची रक्कम ४,५००/- रुपये तडजोडीअंती लाच मागणी रक्कम २,८००/- रुपये स्वीकारलेली लाच रक्कम २,८००/- रुपये पडताळणी दिनांक ०५/१२/२०२३ सापळा दिनांक १८/१२/२०२३ ठिकाण :- जुनी जिल्हा परिषद समोर फुटपाथवर, पुणे.
थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार हे त्यांचे नावे असलेली शिधापत्रीका पूर्ववत करणेसाठी व अन्न धान्य पुरवठा चालु करणेकरीता जुनी जिल्हा परिषद इमारतीमधील अन्न धान्य वितरण पुरवठा अधिकारी याना तक्रारदार भेटले. सदर कार्यालयाचे ठिकाणी असलेला खाजगी इसम शंकर क्षिरसागर याने तक्रारदार यांना साहेबाचे काम मी करतो व तुमचे रेशनकार्ड काढून देतो असे सांगून तक्रारदार यांचेकडे ४,५००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यानी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, खाजगी इसम शंकर क्षिरसागर यानी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वरील काम करून देणेसाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून तडजोडीअंती २,८००/- रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष मागणी करुन, आरोपी खाजगी इसम शंकर क्षिरसागर यानी तक्रारदार यांचेकडून रुपये २,८००/- (दोन हजार आठशे रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. खाजगी इसम शंकर क्षिरसागर याना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in