सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई .२,३०,००० / – रुपये

एन्टी करप्शन ब्यूरो सांगली

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

२२.०६.२०२१ श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख ता . जत जि . सांगली व श्री . विशाल विष्णू उदगीरे वय ३७ वर्ष , तलाठी माडग्याळ अति.कार्यभार काळगीरी यांनी २,३०,००० / – रुपये लाच स्विकारले बाबत कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई .

सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

तक्रारदार हे त्यांचे वाहनामधून मातीवाहतूक करीत असताना त्यांची वाहने श्री . हणमंत म्हेत्र , अपर तहसिलदार संख व श्री . उदगीरे तलाठी माडग्याळ यांनी अडवून कारवाई कामी अपरतहसीदार कार्यालय संख या ठिकाणी लावली होती . सदर वाहनांवर कारवाई न करण्याकरीता व वाहने सोडण्याकरीता श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख व श्री . उदगीरे तलाठी माडग्याळ यांनी तक्रारदार यांचेकडे २,५०,००० / – रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि .०५.०६.२०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता . तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०९ .०६.२०२१ रोजी , दि .११.०६.२०२१ रोजी , दि .१६.०६.२०२१ रोजी तसेच आज दि .२२.०६.२०२१ रोजी व्युरोच्या कार्यप्रणात्नीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनावर कारवाई न करण्याकरीता व वाहने सोडण्याकरीता यातील श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख व श्री . उदगीरे तलाठी माडग्याळ यांनी तक्रारदार यांचेकडे २,५०,००० / – रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले . त्यानंतर आज दि .२२.०६.२०२१ रोजी अपर तहसिलदार कार्यालय संख या ठिकाणी सापळा लावला असता श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख ता . जत जि . सांगली व श्री . विशाल विष्णू उदगीरे वय ३७ वर्ष , तलाठी माडग्याळ अति कार्यभार कोळगारी यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून श्री . हणमंत म्हेत्र , अपर तहसिलदार संख ता . जत जि . सांगली यांचे सांगणेवरून श्री . विशाल विष्णू उदगीरे वय ३७ वर्ष , तलाठी माडग्याळ अति कार्यभार कोळगौरी यांनी तक्रारदार यांचेकडून २,३०,००० / – रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख ता . जत जि . सांगली हे फरार आहेत . त्या अनुषंगाने श्री . हणमंत म्हेत्रे , अपर तहसिलदार संख ता . जत जि . सांगली व श्री . विशाल विष्णू उदगीरे वय ३७ वर्ष , तलाठी माडग्याळ अति.कार्यभार कोळगीरी यांचे विरुध्द उमदी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे .

सदरची कारवाई मा . श्री . राजेश बनसोडे सोो पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , श्री . सुरज गुरव श्री . अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे , सुहास नाडगौडा सो , अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री . सुजय घाटगे , पोलीस उप अधीक्षक , श्री . गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक , श्री . प्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार अविनाश सागर , अजित पाटील , संजय संकपाळ , राधिका माने , संजय कलगुटगी , रविंद्र धुमाळ , सलीम मकानदार , प्रितम चर्चागुले , धनंजय खाडे , श्रीपती देशपांडे , भास्कर भारे , सिमा माने , चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे .

नागरिकांना आवाहन करण्यात येते की , लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक , लाच लुचपत प्रतिबंधक , विभाग , बदाम चौक , सांगली . येथे अथवा कार्यालयौन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८ ९ ७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा . संपर्क : १ ) मोबाईल अॅप – www.acbmaharashtra.net २ ) फेसबुक पेज – www.facebook.com – maharashtraACB ३ ) वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *