लोणी काळभोर पोलिसांनी जबरदस्त कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

लोणी काळभोर पोलिसांनी जबरदस्त कारवाई
११ जणांची फसवणूक करणाºया बापलेकांना पाकिस्तान बॉडरजवळ ठोकल्या बेड्या

ONLINE PORTEL NEWS 9822331526

पुणे – ११ जणांची फसवणूक करणाºया बापलेकांना पाकिस्तान बॉडरजवळील भुज-कच्छ येथे बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई पुणे शहर पोलीस दलाच्या लोणी काळभोर पोलिसांनी केली. या आरोपींच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्याची उकल होणार असून, त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

CHIEF EDITOR WAJID S KHAN
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणे यांनी पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना दिले. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सन २०१३ ते सन २०१९ या कालावधीमध्ये ऊरुळीकांचन मधील एल.सी.जोशी अ‍ॅन्ड कंपनी, हिरेन ट्रेडिंग कंपनी, श्री ओकार ट्रेडर्स, दीपक टी सप्लायर्स या कंपनीचे मालक भरतकुमार चरणदास जोशी व त्यांचे मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी (रा. सहयोग नगर, भुज, कच्छ, गुजरात) यांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ०७ वर्षांच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरून व आरटीजीएसने रक्कम घेऊन त्यांना कसल्याही प्रकारचा आकर्षक परतावा परत न देता तसेच त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात केला. आर्थिक फसवणुक केली. तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे चेकद्वारे व रोखीने घेऊ न त्यांना परत न देता त्यांची सुद्धा अशी एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केली म्हणून ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (गु.र.नं ७१५/२०२० भादंवि कलम ४२०,४०६ सह महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंधिताचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३, ४ नुसार) २५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .


या गुन्ह्याचा तपास प्रथम लोणी काळभोर पोलीस ठाणे येथील सपोनि पवन चौधरी यांच्यासह
आर्थिक गुन्हे शाखेचे राजेंद्र कदम, पोलीस उप – अधिक्षक , आर्थिक गुन्हे शाख , पुणे ग्रामीण व तदनंतर पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी केला
.

तपासादरम्यान आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पथक गुजरात येथे दोन वेळा तसेच मुंबई येथे एक वेळा जावून आले, परंतु नमुद आरोपी हे प्रत्येक वेळी पोलीस पथकास चकवा देत होते. तसेच स्वत:चे अस्तित्वाबाबत कोणत्याही प्रकारचा पुरावा पोलिसांना मिळणार नाही यांची दक्षता घेत होते. परंतु लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात वर्ग झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी नमुद आरोपी यांचे मूळ राहण्याचे ठिकाण, आरोपीचे नातेवाईक, गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे चौकशी तसेच इतर तांत्रिक बाबीचा अभ्यास करून नमूद आरोपींचा शोध घेण्याकामी पोलीस पथकासह गुजरात येथे जावून आरोपीचे राहते ठिकाणी सलग ३ दिवस आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची खात्री पटताच पोलिसांनी भरतकुमार चरणदास जोशी व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी यांना पाकिस्तान सिमारेषा जवळ भुज येथून ताब्यात घेतले.

तपासी पोलीस पथक
या गुन्ह्याची उकल अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अमित गोरे, पोलीस उप – निरीक्षक, हवालदार नितीन गायकवाड, हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुभाष काळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ), लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन
अवाहन नमुद अटक केलेले आरोपी यांनी लोणी काळभोर, ऊरुळीकाचंन अथवा इतर परिसरातील नागरिकांची वरील पद्धतीने फसवणूक केल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *