Traffice Police

बिबवेवाडी येथील खुनाचा प्रयत्न व सराईत गुन्हेगार च्या अंत्यविधी ची रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या 3 गुन्ह्यात फरार आरोपीला पकडले


ONLINE PORTEL NEWS 9822331526

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

२२/०६/२०२१ बिबवेवाडी येथील खुनाचा प्रयत्न व सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन दहशत पसविणा – या ३ गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद

दिनांक १५/५/२०२१ रोजी रात्रौ ०१.३० वा सुमास इसम नामे सावन गवळी रा . बिबवेवाडी ओटा पुणे यास त्याच्या ओळखीचा मित्र नामे सुनिल खाटपे याने त्यांच्या मित्र आनंद कामठे याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा व्हॉटसपवर स्टेटस ठेवल्याचा राग मनात धरुन ” बघ आज तुझे तुकडे करायला कशी माझी गँग आली आहे ” असा आरडाओरडा करीत सुनिल खाटपे व त्याचे साथीदार अमित खाटपे , माधव वाघाटे , सिध्दार्थ पलंगे , कुणाल चव्हाण व इतर ५ ते ६ इसमांनी हातातील लोखडी कोयत्याने सावन गवळी याचा डोक्यात वार केला तो वार चुकवला असता लाकडी बांबु व दगडाने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली त्याबाबत सावन गवळी याने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुरनं ११२/२०२१ भादवि कलम ३०७ , १४३ , १४७ , १४८ , १४९ मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५ गुन्हा दाखल करण्यात आला होता . वरील भांडणामध्ये सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे माधव वाघाटे यांचा बिबवेवाडी ओटा येथे खुन झाला होता . त्यांनतर सदर गुन्हेगारांची मयत बॉडी ही त्याचे राहते घर हेरंब अपार्टमेंट बालाजीनगर पुणे येथे ससुन हॉस्पीटल मधुन आणलेनंतर पुढील अंत्यविधी करीता कात्रज स्मशानभुमी येथे दुपारी ०१.०० वा सुमारास अॅम्ब्युल्नस मधुन घेवुन जात असताना अॅम्ब्युलन्सचे मागे किमान १०० ते १२५ दुचाकी वाहनावर डबल सिट , ट्रिपल सिट इसम बसुन पुणे शहर आयुक्तालयांचा कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी जमाव करण्यास , सभा घेण्यास , व मिरवणुक काढण्यास बंदी असल्याबाबत आदेश असताना अंत्यविधीची परवानगी न घेता सदर आदेशाचा भंग करुन सिध्दार्थ पलंगे , कुणाल चव्हाण , सुनिल खाटपे , अमित खाटपे , रामा उमाप यांनी नेतृत्व करुन बालाजीनगर ते कात्रज स्मशानभुमी दरम्यान रॅली काढुन दहशत निर्माण केली होती . त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि १२६/२०२१ भादवि कलम १४३ , ३०८,३३२ , २६८,२६ ९ , २७० , १८८ , १५८ , १२० ( ब ) , मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५ , क्रीमीनल लॉ अॅमेन्टमेंट ॲक्ट कलम ७ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) , साथ रोग अधिनियम १८८७ चे कलम ३ तसेच भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुरनं ४१९ / २०२१ भादंवि कलम १८८,२६९ मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५ , महाराष्ट्र कोव्हीड · १ ९ उपाययोजना २०२० चे कलम ११ , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( ब ) प्रमाणे गुन्हा नोंद केले होते . त्यापैकी नेतृत्व करणारे काही आरोपी अटक करण्यात आले होते त्यातील सिध्दार्थ पलंगे हा वरील खुनाचा प्रयत्न व अंत्यविधीची रॅली काढलेबाबत गुन्हा दाखल झालेपासुन २ महिन्यापासुन फरार होता . दिनाक – २२/०६/२०२१ रोजी पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , वरील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे आरोपी सिध्दार्थ पलंगे हा खेड शिवापुर दर्गाजवळ मित्राला भेटणेसाठी येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्या बाबत मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव युनिट -१ , गुन्हे शाखा यांना कळविण्यात आले . त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार व मार्गदर्शनान्वये बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करीत असताना सदर इसम हा खेड शिवापुर दर्गाजवळ मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव सिध्दार्थ संजय पलंगे वय २१ वर्षे रा . गुलमोहर सोसा . रजनी कॉर्नर बालाजीनगर पुणे असे सांगितले . त्यांस युनिट – १ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन वरील दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने वरील ३ गुन्हे केल्याचे कबुल केलेले आहे . सदर आरोपीवर सहकारनगर , दत्तवाडी , बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे जबर दुखापत , मारामारी अशा प्रकारचे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त , मा.श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे . श्री श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशना खाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव , पोलीस उप – निरीक्षक सुनिल कुलकर्णी , संजय गायकवाड पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख , तुषार माळवदकर , आय्याज दड्डीकर व महेश बामगुडे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *