Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

पोलिसांनी लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरातील हुक्का पार्लरवर टाकला छापा, apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी लाेणावळ्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठाेस पावले उचलली आहेत. लाेणावळा पालिकेस देखील काही उपाययाेजना सूचविल्या आहेत.

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर लाेणावळा पाेलिसांनी कारवाई केली आहे. याबराेबरच बेकायदेशिर हुक्का विक्री प्रकरणी तसेच रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणा-यांवर लाेणावळा पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्त केले.

लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी खटला दाखल केला, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. राज्य शाससाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे.बेकायदा हुक्का पार्लर चालविणारे संतोष शंकर आखाडे (वय २७, रा. रामनगर, भुशी, लोणावळा), दीपक भागू हिरवे (वय २७, रा. देवघर, ता. मुळशी ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई रईस मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. आखाडे, हिरवे यांच्याकडून सात हुक्का पात्र, फिल्टर, सुुगंधी तंबाखू असा १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.लायन्स पाॅइंट परिसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणे, तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या परिसरातील दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोणावळा शहर पोलिसांचे पथक रात्री लायन्स पाॅइंट परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी आखाडे आणि हिरवे बेकायदा हुक्का पार्लर चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले, तसेच तीन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, दत्ता शिंदे, सुभाष शिंदे यांनी ही कारवाई केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *