कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये अँटीकरप्शन ची धडाकेबाज कारवाई दोन लाखाची लाच सहाय्यक पोलीस निरीक्षकावर अँन्टी करप्शन ने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दि . २४/११/२०२२ कोंढवा पोलीस स्टेशन ,पुणे शहर,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे- शहर पोलीस दलात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून एक महिन्यापूर्वी एका पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांना लाच मागताना पकडण्यात आले होते हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीने या गैरप्रकारांलची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांना निलंबित केले होते,

या लाच प्रकरणाला एक महिना उलटत नाही तोच कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज अनंत पाटील या अधिकाऱ्याला, दोन लाख लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे,

जागा, प्लॉटच्या वादासंदर्भात पत्नीने आणि सासऱ्याने केलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे गृह विभाग ‘खाकीची प्रतिमा’ सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे निरीक्षक नुकताच प्रकार, कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये घडला आहे,

सदर तक्रारीची दिनांक २५/०५/२०२२ व दि. ०२/०६/२०२२ रोजी पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक, स्वराज पाटील यानी दोन लाख रूपयांची लाच मागणी केली म्हणून वरीलप्रमाणे लाव मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्वराज आनंद पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुणे एसीबीकडून कोंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ साधण्याचे आवाहन श्री . अमोल तांबे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

अॅन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४ , २६१३२८०२,२६०५०४२३ व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *