दुकानदाराकडुन पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे अकाऊंटमध्ये घेऊन फसवणुक करणारा आरोपीला केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी म्हणून दुकानदाराकडुन फसवणुक.

चंदननगर पोलीस स्टेशन ची कामगिरी.

पेटीएम अकाऊंट पोस्टपेड करुन १० मिनीटांमध्ये पेटीएमवरुन ३५,००० / – रुपयांचे लोन मंजुर करुन स्वतःचे अकाऊंटमध्ये वर्ग करुन घेतली.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दिनांक २३/११/२०२२ चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर दुकानदाराकडुन पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवुन , त्यांचे पेटीएम मोबाईल वरुन १० मिनीटांत लोन मंजुर झालेनंतर सदरची रक्कम स्वतःचे अकाऊंटमध्ये घेऊन फसवणुक करणारा ओरीसातील आरोपीस केले जेरबंद.

चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर रजि . नं . ४१५/२०२२ भा.दं.वि. कलम ४०६ , ४२० , आय . टी . अॅक्ट कलम ६६ ( सी ) .६६ ( डी ) मधील फिर्यादी यांना पेटीएम साऊंड बॉक्सवर ऑफर असुन , जुना बॉक्स घेऊन कंपनीकडुन नवीन बॉक्स घेऊन देतो .

तसेच पेटीएमवरती लोन मंजुर करुन देतो असे सांगुन , त्यांचा मोबाईल घेऊन त्यामध्ये त्यांचे पेटीएम अकाऊंट पोस्टपेड करुन १० मिनीटांमध्ये पेटीएमवरुन ३५,००० / – रुपयांचे लोन मंजुर झालेनंतर सदरची रक्कम स्वतःचे अकाऊंटमध्ये वर्ग करुन घेतली म्हणुन याबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .यामधील आरोपीचे प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता , सदरचा आरोपी हा चंदननगर परिसरात असल्याचे समजले . त्यानुसार त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले असता , त्याने त्याचे

नाव अजित कुमार अक्षयकुमार पटनाईक , सध्या रा . तुळसीनगर , भाजी मार्केट जवळ , शिवले यांचे बिल्डींग मध्ये , चंदननगर , पुणे मुळ रा . स्टेशन बाजार मत्ता सही कॉलेज , स्क्वेअर कटक ओरीसा असे असल्याचे सांगितले . त्यास विश्वासात घेता त्याने अशाच प्रकारे अजुनही दुकानदार व्यावसायीकांना फसविलेले असल्याचे सांगितले आहे . अशा प्रकारे व्यावसायिक दुकानदार यांची फसवणुक झालेली असल्यास त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याशी किंवा संबधीत पोलीस ठाण्याशी संपर्क साधणेबाबत आव्हान श्री राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चंदननगर पोलीस स्टेशन पुणे यांनी केलेले आहे .

सदरची कारवाई ही श्री अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री .संदीप कर्णिक , पोलीस सह आयुक्त , पुणे शहर , श्री . नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , श्री शशिकांत बोराटे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -४ , पुणे शहर , श्री . किशोर जाधव , सहाय्यक पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन पुणे , श्री जगन्नाथ जानकर , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , रामेश्वर रेवले , पोलीस उपनिरीक्षक , व पोलीस अंमलदार सुरज जाधव , अजय शेळके , मनोज भंडारी यांनी केलेली आहे ..

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *