अवैद्य रित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलीस स्टेशन ने केली अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची कारवाई,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला मुंढवा पोलीस तपास पथकाने जहांगीर चौक ते आंबेडकर चौक दरम्यान घोरपडी पुणे येथून सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि २,काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

निलेश भाऊराव काळे, वय २५ वर्षे रा. गोकुळनगर, स्वामी समर्थ मंदीरामागे कात्रज पुणे गुळ गाव अहमदनगर असे या आरोपीचे नाव आहे,

मुंडवा पोलीस स्टेशन कडील तपास पथकाला
जहांगीर चौक ते आंबेडकर चौक दरम्यान घोरपडी पुणे येथे एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन विक्री करण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार मुंडवा पोलीस ठाणे कडील तपास अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आहेत. गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे या पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचेकडुन आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस मिळुन एकुण ०२ पिस्टल आणी ०३ जीवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर ३१०/२०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन
अग्निशस्त्रे व काडतुसे त्याने कोठून व कशासाठी आणली आहेत, याचा तपास सहा पोलीस निरीक्षक संदिप जोरे करीत आहे,

मुंढवा पोलीस ठाणे यांनी यापुर्वीच दिनांक ०१/११/२०२२ रोजी देखील इसम नामे अविनाश सुनिल जगताप, वय २९ वर्षे, रा. चव्हाण चाळ, गोपी मैडिकल शेजारी २२६ मंगळवार पेठ पुणे याचे कब्जात १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास तपास पथकाने सापळा रचुन त्याचे कब्जात १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे ताब्यात घेवुन कारवाई केलेली आहे. सदरबाबत गुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर २८८/२०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अशाप्रकारे एकाच महिन्यात मुंढवा पोलीसांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणा-या दोन इसमांवर वेगवेगळ्या कारवाया केलेल्या असुन त्यामध्ये एकुण ३ गावठी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री. अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, सचिन पाटील यांनी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *