खंडणी चा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटले . दरोडेखोरांना अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १८/०८/२०२१ खंडणी चा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटले . ६ खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना अटक : महाळुगे पोलीसांची कारवाई

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दि ०८/०८/२०२१ रोजी राजौ ०८:०० वा चे सुमारास मौजे – भांबोली , ता – खेड , -जि – पुणे गावचे हद्दीत छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकामध्ये फिर्यादी – अक्षय किसन कोळेकर , वय २४ वर्ष यांची पान टपरी आहे . सदर पान टपरी चालु ठेवायची असेल तर , प्रत्येक महीन्याला १,००० / रु हप्ता दे , अश्या खंडणीची मागणी फिर्यादी अक्षय कोळेकर याचेकडे सराईत गुन्हेगार – संतोष मधुकर मांजरे याने केली . परंतु फिर्यादी अक्षय कोळेकर याने सराईत गुन्हेगार संतोष मांजरे यास हप्ता देण्यास नकार दिला . व त्याचे विरोधक पार्टीचा सदस्य – अनिल धोंडीबा निखाडे यास मदत केली , त्यामुळे चिडुन सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याने त्याचे इतर ९ ते १० साथीदारांसह येवुन फिर्यादी – अक्षय किसन कोळेकर व त्याचे मित्र जीवन मधुकर पवार , सचिन ज्ञानदेव बोत्रे यांना पिस्टलचा धाक दाखवुन लोखंडी कोयते , लाकडी दांडके यांनी डोक्यात , हातापायावर मारहान करुन गंभीर दुखापत केली . तसेच जीवन मधुकर पवार याचे गळयातील ४०,००० / रु किमतीची सोन्याची चैन , सचिन ज्ञानदेव बोजे याचे गळयातील २०,००० / रु किंमतीची सोन्याची चैन असा ६०,००० / रुचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने दरोडा घालुन लुटला .

सदर घटने बाबत चाकण पो.स्टे . येथे गुन्हा रजि.नंबर ९६० / २०२१ , भा.द.वि.क -३९५ , ३९७ , ३८७ , ३४१ , आर्म अॅक्ट , ३ ( २५ ) , ४ ( २५ ) क्रिमिनल लॉ अमेंटमेट अॅक्ट ३ , ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब व मा.पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ १ श्री मंचक इप्पर साहेब यांनी गुन्हयातील आरोपीचे शोधा करीता दिलेल्या सुचना प्रमाणे महाळुगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पो.निरी अरविंद पवार व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.निरी . दत्तात्रय गुळीग यांनी दोन पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन ०६ आरोपींना जेरबंद केले . त्यांची | मा.कोर्टाकडुन पोलीस कस्टडी रिमाड घेतली आहे . ( अटक आरोपी )

१ ) आकाश बाळासाहेब शेळके , वय २५ वर्ष , रा – कोरेगाव खुर्द , ता – खेड , जि – पुणे

२ ) गणेश बबन डांगले , वय २० वर्ष , रा – गवारवाडी , पाईट , ता – खेड , जि – पुणे

३ ) नारायण सुनिल घावटे , वय २१ वर्ष , रा – शेलु , ता – खेड , जि – पुणे

४ ) गणेश हिरामन लिंभोरे वय २० वर्ष , रा- शेलु , ता – खेड , जि – पुणे

५ ) विठ्ठल नवनाथ पिकळे , वय २१ वर्ष , रा – कोरेगाव खुर्द , ता – खेड , जि – पुणे

६ ) साईनाथ रामनाथ राऊत , वय ३० वर्ष , रा – भांबोली , ता – खेड , जि – पुणे

पाहीजे आरोपी १ ) संतोष मधुकर मांजरे , रा – कोरेगाव खुर्द , ता – खेड , जि – पुणे

२ ) प्रदीप अरुण पडवळ , रा – बोरदरा , आंबेठाण , ता – खेड , जि – पुणे

३ ) सुमीत भोकसे , रा – कुरकुंडी , ता – खेड , जि – पुणे

४ ) इतर अनोळखी इसम .

जप्त हत्यारे –

३ लोखंडी कोयते , ४ लाकडी दांडके , ३ मोटार सायकली ,

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश , मा.अपर पोलीस आयुक्त | | श्री.रामनाथ पोकळे , मा पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) श्री सुधीर हिरेमठ , मा.पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ – श्री मंचक इप्पर , मा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे , महालुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक | | अरविंद पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक | दत्तात्रय गुळीग , पोलीस हवालदार चंदु गवारी , राजु जाधव , राजु कोणकेरी , अमोल बोराटे , विठ्ठल वडेकर , शिवाजी लोखंडे , संतोष काळे , श्रीधन इचके , हिरामन सांगडे , शरद खैरे , यांनी पार पाडली . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन सुर्यवंशी हे करीत आहेत .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *