खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा ५० लाख रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहाथ पकडले

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

दिनांक – २५/०६/२०२१ खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा , पुणे शहर कॉन्ट्रक्टरला खंडणी मागणा – या २ आरोपीस सापळा रचून ५० लाख रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहाथ पकडले

ONLINE PORTEL NEWS 9822331526

तक्रारदार यांचा इंडस्ट्रियल कंपनी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांना दि .१६ / ०६ / २०२१ रोजी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन करून “ पचास लाख रुपये दे नही तो ठोक दूंगा , कल तक पैसा रेडी रखने का मै जो बोल रहा हूं वही सुनने का पैसे का इंतजाम रखनेका , पोलीस को पता चला तो अंजाम जानता है , तेरा खानदान तो पूरा गया ” असे म्हणून ५० लाखाची खंडणी मागितलेबाबत मा.पोलीस उपआयुक्त गुन्हे यांचेकडे तक्रार करणेत आलेली होती , सदर तक्रारीबाबत मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , मा.पोलीस उपआयुक्त , गुन्हे , मा.सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -२ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांचे खंडणी विरोधी पथक -२ कडील अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना आज रोजी यातील आरोपी याने फोन करून फिर्यादी यास ५० लाख रुपये घेवून औंध परिसरामध्ये बोलाविले असता सदर ठिकाणी आरोपी हे फिर्यादीकडून ५० लाख रुपये स्विकारले असता खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून आरोपीतास रंगेहाथ पकडले.त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजुहरउद्दी शेख , वय -२४ वर्षे , रा . शाहूनगर , चिंचवड मुळ रा.पश्चिम बंगाल असे सांगितले व त्याचेकडे तपास केला असता त्यास खंडणी मागण्यासाठी प्रोत्साहित करणारा व मुख्य आरोपी ( कट करणारा ) संतोष सुरेश देवकर , रा . शाहूनगर , चिंचवड असे असल्याचे सांगितले व परिसरात शोध घेवून त्यास सुध्दा ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता यातील आरोपी संतोष देवकर हा तक्रारदार यांचा पूर्वीचा ड्रायव्हर असल्याचे व २०१६ मध्ये त्याने काम सोडल्याचे तपासामध्ये सांगितले .फिर्यादी यांनी त्यावेळी आरोपी संतोष देवकर यास वेळोवेळी आर्थिक मदत केलेली होती , त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती व मानसिक परिस्थितीचा अंदाज घेवून स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी आरोपी संतोष देवकर याने सदरचा कट रचला असल्याचे तपासामध्ये गुन्हयाची कबूली दिलेली आहे.आरोपी नामे -१ ) अजुहरउद्दी शेख , वय -२४ वर्षे रा . शाहूनगर , चिंचवड मुळ रा . पश्चिम बंगाल व २ ) संतोष सुरेश देवकर , वय -३२ . रा.शाहूनगर , चिंचवड यांचेविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री.अशोक मोराळे , मा.पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) , श्री.श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विनोद साळूके , शैलेश सुर्वे , प्रदिप शितोळे , सुरेंद्र जगदाळे , सचिन अहिवळे , प्रविण पडवळ , आशा कोळेकर , प्रदिप गाडे , संपत अवचरे , विजय गुरव , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , अमोल पिलाने , भूषण शेलार , मोहन येलपल्ले , चेतन शिरोळकर , रुपाली कर्णवर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक -२ . गुन्हे शाखा यांनी केलेली आहे .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *