गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्टल व दोन राऊंड जप्त

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक – २५/०६/२०२१ गुन्हे शाखा युनिट -३ , पुणे शहर सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्टल व दोन राऊंड जप्त

ONLINE PORTEL NEWS 9822331526

वरिष्ठांचे आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.अनिल शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट -३ चे पथक दि .२३ /०६ / २०२१ रोजी कोथरुड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत फिरत असताना पोलीस हवालदार राजेद्र मारणे यांना मिळालेल्या बातमीवरुन रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय शंकर सुतार वय २० वर्षे रा.स नं २ , बालाजी किराणा दुकानाजवळ , इस्कॉन टेम्पलचे पाठीमागे , टिळकर नगर , कोंढवा , पुणे यास कोथरुड , लोहीया जैन आयटी पार्क समोर पुणे येथून ताब्यात घेतले . त्याचे ताब्यातून एक गावठी बनावठीचा पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ४०,८०० / – रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला असून त्याचे विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. १३२/२०२१ आर्म अॅक्ट कलम ३ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत आहेत.नमूद आरोपीत हा सिहंगड रोड पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा व दंगा केल्यांचे गुन्हे दाखल आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त , श्री.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे गुन्हे , पुणे शहर , मा.पोलीस उप – आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे गुन्हे , पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्र देशमुख प्रतिबंधक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अनिल शेवाळे , सहा.पोलीस निरीक्षक , अमृता चवरे , पोलीस उप निरीक्षक , दत्तात्रय काळे , पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे , संतोष क्षिरसागर , एकनाथ कंधारे , हणुमंत गायकवाड , रामदास गोणते , संदिप तळेकर सुजित पवार , भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *