दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा पुणे शहर फरासखाना पोलीस स्टेशनकडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

२६/०६/२०२१ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा पुणे शहर फरासखाना पोलीस स्टेशनकडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

ONLINE PORTEL NEWS

दिनांक २५/०६/२०२१ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील सपोफौ शेख , पोना ३०४२ अतुल मेंगे , पोना २८८ ताजणे , पोना ७८३ पाटोळे , पोना मॅगी जाधव व पोलीस अंमलदार १००१ ९ ताकपेरे हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत पाहिजे / फरारी / मोका / तडीपार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार १००१ ९ सुमित ताकपेरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की , फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ९७ / २०२१ , भादंवि कलम ३०७,३२४,३२३,१४३,१४४,१४६,१४७,१४८,१४ ९ , ५०६ व महा पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) सह १३५ या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे जुल्फीकार नजीर शेख , रा . रविवार पेठ , पुणे व त्याचा साथिदार मुस्तफा नजीर शेख रा . सदर हे ६५६ शुक्रवार पेठ , पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन शिताफिने दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी १ ) जुल्फीकार नजीर शेख , वय ३२ वर्षे , रा . १६१ , रविवार पेठ , पुणे व २ ) मुस्तफा नजीर शेख , वय- २७ वर्षे , रा . सदर यांस ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने वरील दोन्ही आरोपीतांना पुढील कारवाईकरीता फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे .

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे श्री.श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री . सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण , पोलीस निरीक्षक , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर , सपोफौ शाहिद शेख , पोना अतुल मेंगे , पोना धनंजय ताजणे , पोना गणेश पाटोळे , पोना प्रमोद मोहिते , पोना मॅगी जाधव व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचे पथकाने केली

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *