Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई १० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या अटक करण्यात आली.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दि. २०/०२/२०२३ (ACS NEWS) अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय, औंध, पुणे.

अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे येथील सहायक आयुक्त (अन्न) यांचेवर लाच स्विकारले प्रकरणी कारवाई.

थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार यांनी त्यांचे कंपनीचे मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना | मिळणेकामी अर्ज केला होता. सदरचा अर्ज मंजूर करुन परवाना देणेकरीता अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे येथील लोकसेवक साहेब देसाई यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती..

पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्ताला १० हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहेब एकनाथराव देसाई असे ताब्यात घेण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. यासंदर्भात ५४ वर्षीय व्यक्तीने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे कंपनीचे मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. सदरील अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेब देसाई यांनी त्यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी केली.

त्यानंतर त्यांनी १० हजार रूपयाची लाच घेतली असता अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले त्यानंतर त्यांनी १० हजार रूपयाची लाच घेतली असता अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले .अ‍ॅन्टी करप्शनच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर अधीक्षक सुरज गुरवयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, ला.प्र.वि. पुणे हे तपास करत आहेत.


अ‍ॅन्टी करप्शनच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४


.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *