आता कोविड -१९ संदर्भाने नियम मोडणा – या नागरीकांना दंड ऑनलाईनही भरता येणार

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

दिनांक २६/०६/२०२१ आता कोविड -१९ संदर्भाने नियम मोडणा – या नागरीकांना दंड ऑनलाईनही भरता येणार

ONLINE PORTEL NEWS 9822331526

मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोविड -१९ महामारीच्या संसर्ग जन्य आजारामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल हे कोविड -१९ आजाराचा संसर्ग कमी करण्यासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नाकाबंदी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग , प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त , मास्क कारवाई , लोकांमध्ये जनजागृती ,

सोशल पोलिसींग तसेच लोकांना ज्या ठिकाणी जेवणाची गरज आहे अशा ठिकाणी लोकांना फुड पॅकेटचे वितरण अशा प्रकारची कर्तव्य व इतर जबाबदारी आपले दैनंदिन प्रथम प्राधान्य असलेले कायदा व सुव्यवस्था राखण्याचे तसेच लोकांचे मालमत्तेचे व जीवीताचे रक्षण करतान्याचे काम करतानाच खंबीरपणे पार पाडली आहे व पार पाडत आहेत . सदर कालावधीत नागरीकांनी कोविड -१९ संदर्भात दिलेले निर्देश पाळावेत व कोविड -१९ आजाराच्या संसर्ग वाढण्याला प्रतिबंध बसावा या साठी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे नागरीक , ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ आस्थापना चालु ठेवणारे दुकानदार , दुकानामध्ये सोशल डिस्टंसिंग न ठेवणारे दुकानदार अशा प्रकारे कोविड -१९ आजाराचे संदर्भाने दिलेले नियम न पाळणारे नागरीक यांना यांना दंड आकारण्यात येत आहे .

आतापर्यत सदर आकारण्यात येणारा दंड हा नियम मोडणारे नागरीक यांचेकडुन रोख स्वरुपात घेण्यात येत होता . परंतु काही लोकांची सुचना होती की . सदर दंड हा ऑनलाईन स्वरुपातही घेण्यात यावा .

मा.पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन दि .२३ / ०६ / २०२१ रोजी पासुन सदर कोविड -१९ आजाराचे संदर्भाने नियम मोडणा – या नागरीकांकडुन आकारण्यात येणारा दंड हा आता ऑनलाईन स्वरुपातही भरता येणार आहे .

त्यासाठी मा.सहा.पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर यांचे देखरेखीखाली एचडीएफसी बँक येथे सदर दंड आकारण्यासाठी वेगळे खाते उघडण्यात आले असून सर्व पोलीस स्टेशन वाहतुक शाखा यांना त्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल फोन , क्युआर कोड , क्यु आर कोड फ्लेक्स , इ . चा पुरवठा करण्यात आलेला आहे . तसेच ऑनलाईन दंड स्विकारणेबाबत सर्व पोलीस स्टेशन कडील डे – बुक व सर्व वाहतुक शाखांकडील डयुटी वाटप करणारे पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे .

यापुढे जे नागरीक कोविड -१९ आजाराचे संदर्भाने दिलेले नियम मोडतील अशा नागरीकांना दंडाची रक्कम पुणे शहर पोलीसांना क्यु – आर कोड व्दारे भरु शकता आपण आपल्या मोबाईल फोन मधील कोणत्याही युपीआय अॅपव्दारे क्यु – आर कोड स्कॅन करा व दंड भरा असे आवाहन पुणे शहर पोलीसांचे वतीने करण्यात आले आहे . आता पर्यत ऑनलाईन पध्दतीने तीन दिवसात २४,००० / – रुपये दंड जमा झाला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *