लोखंडी पाटयाचे वेगवेगळया वर्णनाच्या एकुण २६ तलवारी बाळगणारा इसम जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १०/०७/२०२१ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर लोखंडी पाटयाचे वेगवेगळया वर्णनाच्या एकुण २६ तलवारी बाळगणारा इसम जेरबंद

ONLINE PORTAL NEWS 9822331526

दिनांक ० ९ / ०७ / २०२१ रोजी सहा.पोलीस फौजदार शेख , पो.हवा . ८०९ शिवतरे , पो.ना. ३०४२ मेंगे , पो.ना. २८८ ताजणे व पो.शि. १००१९ ताकपेरे असे पोनि चव्हाण मॅडम यांचे मौखिक आदेशाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत पाहिजे / फरारी / तडीपार व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत तीन हत्ती चौक ते तळजाई पठारकडे जाणा – या रस्त्यावर , धनकवडी , पुणे या ठिकाणी आलो असता पो.हवा . ८०९ शिवतरे व पो.ना. २८८ ताजणे यांचे गोपनिय बातमीदाराने समक्ष येवुन बातमी दिली की ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

इसम नामे प्रतिक ज्ञानेश्वर भोसले रा . बिबवेवाडी , पुणे याने त्याचे फायनान्सचे ऑफिस , शिवगंगा अपार्टमेंट , स.नं. २ , सह्याद्रीनगर , धनकवडी , पुणे येथे सदर बिल्डींगच्या टेरेसवर एका पांढ – या पोत्यामध्ये लोखंडी हत्यारे ठेवली आहेत व सदर इसम देखील तेथेच उभा असुन त्याने काळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातली आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची बातमी सपोफौ शेख यांनी पोनि शिल्पा चव्हाण मॅडम यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची योग्य ती खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले .

त्यावर प्राप्त बातमीचे अनुशंगाने शिवगंगा अपार्टमेंट , स.नं. २ , सह्याद्रीनगर , धनकवडी , पुणे येथील टेरेसवर जावुन पाहिले असता मिळालेल्या बातमीतील नमुद वर्णनाचा इसम तेथे उभा असलेला दिसुन आला .

बातमी प्रमाणे पंचांची व आमची खात्री झाल्याने त्यावर अचानक छापा घालुन सदर इसमास १५.२० वा . ताब्यात घेवुन त्यास पंचासमक्ष त्याचे नाव , पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता प्रतिक ज्ञानेश्वर भोसले , वय -३३ वर्षे , रा . ५७३/२३ , पार्श्वनाथ नगर , जितोजी अपार्टमेंट , बिबवेवाडी , पुणे असे असल्याचे सांगितले . त्याचेजवळ असलेल्या पांढ – या रंगाच्या पोत्यामध्ये लोखंडी पाटयाचे वेगवेगळया वर्णनाच्या एकुण २६ तलवारी मिळुण आल्याने त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन , पुणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ सह २५ व महा पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची कारवाई पुणे शहरचे मा पोलीस आयुक्त साो , श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त साो , श्री . डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री . श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त मा . श्री . सुरेंद्रनाथ देशमुख , ( गुन्हे शाखा- १ ) यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण , सपोनि जुबेर मुजावर , स.पो.फौ. शाहिद शेख , पोहवा निलेश शिवतरे , पोना अतुल मेंगे , पोना धनंजय ताजणे , पो.ना. गणेश पाटोळे , पो.अंमलदार सुमित ताकपेरे , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *