गंभीर गुन्ह्यात तीन महिन्यापासून चकवा देणारे सराईत गुन्हेगार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून जेरबंद
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
कडील पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलीस अंमलदार मनोज शिंदे , मनोज खरपुडे, शिवाजी जाधव व संभाजी गंगावणे असे पाहिजे/फरारी/मोका/तडीपार व इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाहनचोरीचे गुन्हे करणारे रेकाॅर्डवरील गुन्हेगार आणि सध्या तीन महिन्यापासून लोणीकंद पो स्टे कडील गु.र.नं.२५९/२०२१ भा.दं.वि.कलम ३०७,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ व आर्म ॲक्ट ४(२५) तसेच महा.पो.का.कलम ३७(१) सह १३५ मधील पाहिजे व फरारी आरोपी नामे
१) सत्यवान उर्फ आप्पा श्रीमंत घाडगे वय२४ रा.वाघोली, पुणे,
२) गणेश दयानंद कांबळे वय २२, रा.ताडीवाला रोड, पुणे.
हे दोघे शिंदे वस्ती शनि मारुती मंदिर समोर, हडपसर, पुणे येथील कॅनालवर संशयित दुचाकी सोबत थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही सदरची बातमी पथक प्रमुख श्री.सुनिल पंधरकर यांना कळविले त्यांनी आम्हास योग्य त्या सुचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमांना अत्यंत शिताफीने गाडीसह पकडले.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
त्यांना अधिक चौकशी करिता दरोडा व वाहनचोरी पथक २ येथील कार्यालयात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचेकडे मिळून आलेली दुचाकी ही महंमद वाडी,हडपसर, पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले.सदर गाडीबाबत तपास केला असता सदर बाबत वानवडी पो.स्टे..गु.र.नं.२१७/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईकामी लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे यांचे ताब्यात देण्यात आले.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. अशोक मोराळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. लक्ष्मण बोराटे सर यांचे मार्गदर्शनात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हेशाखा ,पुणे शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526