लुटमार करणा – या ०४ सराईत आरोपींना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक- २१/०७/२०२१ सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणुन बसवुन लुटमार करणा – या ०४ सराईत आरोपींना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक

ONLINE PORTAL NEWS

इसम नामे सेलवम पिल्ले , वय ४८ वर्षे , धंदा व्यवसाय , रा . दत्तनगर , कात्रज , पुणे हे दि .०२ / ०७ / २०२१ रोजी दुपारचे वेळी मार्केटयार्ड पुणे येथुन आहिल्यादेवी चौक बालाजीनगर पुणे येथे जाण्यासाठी पॅसेंजर म्हणुन रिक्षात बसले . प्रवासादरम्यान त्यांना रिक्षा चालक व त्याचे तीन साथीदारांनी धक्काबुक्की करुन त्यांची सोनयाची चैन काढुन घेतली . सदरबाबत सेलवन पिल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं .१८६ / २०२१ भा.द.वि.कलम ३७९ , ३४ प्रमाणे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे , दाखल गुन्हयाचा तपास मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व श्री.युनुस मुलानी पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुधीर घाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार सागर शिंदे व संदीप ननवरे यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , दाखल गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना रिक्षा क्र . एम.एच .१४ / एच.एम. / ७२९० हिचा वापर केला असुन ते सदर रिक्षामध्ये शिवनेरी नगर कोंढवा पुणे येथे बसलेले आहे .

सदरबाबत मा.वरिष्ठांना कळवुन तात्काळ स्टाफसह खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ येवुन पाहता बातमीतील वर्णनाचे ०४ इसम मध्ये नमुद क्रमांकाचे रिक्षामध्ये बसलेले दिसले . त्याप्रमाणे खात्री होताच त्यांना सापळा लावुन ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १ ) वशिम अजमल खान , वय ३१ वर्षे रा.गल्ली नं .३ , शिवनेरी नगर , कोंढवा खु.पुणे मु.पो.सातीबाजार चौक , नसीराबाद , ता.जि. जळगाव २ ) मोसिन खान नुर खान पठाण , वय २८ वर्षे , रा.मु.पो.सुरेशदादा जैननगर , गेंदालाल मिल जवळ , हुडको , ( पिंप्राळा ) ता.जि.जळगाव , ३ ) अन्सार आयुब खान , वय ३२ वर्षे , रा.शिवनेरी नगर , गल्ली नं .३ , फातिमा मस्जिद जवळ , कोंढवा , पुणे , ४ ) अब्दुल करिम बार्शिकर , वय २६ वर्षे , रा.गल्ली नं .१० , घोरपडी वस्ती , लोणी काळभोर , पुणे असे असल्याचे सांगितले . त्यांचेकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी करता त्यांनी चौघांनी मिळुन त्यांचेकडील वरील रिक्षेचा वापर करुन दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली . नमुद आरोपींना सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे . दाखल गुन्हयात निष्पन्न झालेले वर नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने तपास चालु आहे . नमुद आरोपींकडुन सोन्याचे मालासह एकुण १,०१००० / – रुपयांचा माल हस्तगत केला आहे .

सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , डॉ.श्री.संजय शिंदे सो , पोलीस उपायुक्त , परिमंडळ -२ , श्री.सागर पाटील सो , सहा.पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण सोो . वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री.युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे , पोलीस हवालदार बापु खुटवड , पोलीस नाईक प्रकाश मरगजे , संदिप ननवरे , सतिष चव्हाण , भुजंग इंगळे , पोलीस शिपाई सागर शिंदे , महेश मंडलिक , प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *