वॉन्टेड आरोपींकडून वाहनचोरी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघड

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची कौतुकास्पद कामगिरी गुन्हे शाखेची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची कौतुकास्पद कामगिरी गुन्हे शाखेची कारवाई

वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाई

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी हडपसर, कोंढवा आणि लोणी काळभोर या भागात होणारे वाहनचोरी आणि मोबाईल चोरी गुन्ह्याचे अनुषंगाने परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ ,गुन्हे शाखा यांचेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती.

ONLINE PORTAL NEWS 9822331526

दिनांक १०/०७/२०२१ रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप आणि नेमलेले पथक हे वानवडी, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रामटेकडी येथे एम आय डी सी पुणे कचरा विलिगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीचे मोटर सायकलसह दोन ‌इसम बसलेले असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने

सदरची बातमी पथक प्रमुख श्री.सुनील पंधरकर यांना कळविली . त्यांनी दिलेले आदेश व सुचनाप्रमाणे सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने योग्य तो सापळा रचून सदर ईसमांना मोठ्या शिताफीने गाडीसह पकडले.त्यावेळी त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे

१) आकाश दयानंद गायकवाड वय २२,रा.आबनावे वाडा, उरूळी देवाची, पुणे.

२) प्रशांत मधुकर भोसले वय-२० रा.पालखी मार्ग, उरूळी देवाची,पुणे

अशी असल्याचे सांगितले.सदरवेळी पकडलेल्या इसमांचे कब्जात मिळून आलेली स्प्लेंडर हीचे बाबत माहिती घेतली असता सदर मोटरसायकल ही चोरीची असून वानवडी पो.स्टे.गु.र.नं.८७९/२०२०भा.दं.वि.कलम ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच आरोपींच्या अंगझडतीत किं.रू.१८,०००चे दोन मोबाईल फोन मिळून आले.तसेच सदर इसमांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी आणखीन मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितलेने सदरच्या मोटरसायकल उरूळी देवाची येथील एका इमारतीचे मागे विहिरीजवळ लपवून ठेवलेल्या खालील वर्णनाच्या व किंमतीच्या जप्त केल्या आहेत.
१) ३०,०००/ स्प्लेंडर मो.सा. वानवडीपो.स्टे.गु.र.नं.८७९/२०२०भा.दं.वि.कलम ३७९ २)१५,०००/स्प्लेंडर मो.सा. लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं./२०२१भा.दं.वि.कलम ३७९
३)२०,०००/ स्प्लेंडर प्लस मो.सा.हडपसर पो.स्टे.गु.र.नं.१४०१/२०२०भा.दं.वि.कलम ३७९
४)४०,०००/बजाज पल्सर मो.सा.वाकड पो.स्टे.गु.र.नं.५२३/२०२०भा.दं.वि.कलम ३७९
५)२०,०००/- स्प्लेंडर प्लस मो.सा.हडपसर पो.स्टे.गु.र.नं.१००९/२०२०भा.दं.वि.कलम ३७९
६)१०,०००/- यामाहा मो.सा.कोंढवा पो.स्टे.गु.र.नं.५६६/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
प्रमाणे एकुण १,५३,०००/- रूपये किंमतीचा मूद्देमाल जप्त आहे.
नमूद आरोपींकडून हडपसर पो.स्टे.कडील०२, कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणि वाकड पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी ०१ असे वाहनचोरीचे ०६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच सदर आरोपींनी चोरी केलेल्या मोबाईल फोन बाबत तपास चालू आहे.
अटक आरोपींपैकी आकाश दयानंद गायकवाड हा,
१) कोंढवा पो.स्टे.गु.र.नं.४३९/२१ भादंवि ३७९
२)यवत पो.स्टे.गु.र.नं.१०८९/२०भादंवि ३७९
३) अंबोली पो.स्टे.(मुंबई)गु.र.नं.३५२/२० भादंवि ३७९
४) लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.३०४/२१ भादंवि ३८०,३४
५) लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.३०७/२१ भादंवि ३९२,३४
अशा एकूण ५ गुन्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी असून त्यास सध्या लोणी काळभोर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे

आरोपी नं २ प्रशांत मधुकर भोसले यांस कोंढवा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री.अशोक मोराळे अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर,मा.श्री. श्रीनिवास घाडगेपोलीस उपायुक्त, गुन्हे, मा.श्री. लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२, मा.श्री.सुनिल पंधरकर, पोलीस निरीक्षक, वाहनचोरी विरोधी पथक २ यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे,शाकिर खान,राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *