एटीएम मशीन फोडून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणा – या चोरटयांना चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक – १२/०७/२०२१ चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर एटीएम मशीन फोडून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणा – या चोरटयांना चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
ONLINE PORTAL NEWS 9822331526
दिनांक ११/०७/२०२१ रोजी रात्री चंदननगर पोलीस स्टेशन हददीत रात्रगस्तीवर असलेले अधिकारी व अंमलदार हे रात्रगस्त करीत असताना रात्री ०२/०० वा . चे सुमारास पोलिस कंट्रोल , पुणे शहर यांनी कळविले की , ठुबे पठारेनगर , खराडी , पुणे येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन दोन इसम तोडत असल्याचा कॉल प्राप्त झाल्याने रात्रगस्तीवरील सहा . पोलिस फौजदार- पठाण , पो . ना . सचिन कळसाईत , पो . ना . संदीप पाटील , पो . शि . समीर शेख , असे तातडीने घटनास्थळी पोहचून एटीमएम मशीन फोडणा – या चोरटयांना एक लोखंडी कटावणी , एक लोखंडी मोठा स्क्रू ड्रायव्हर , एक लोखंडी पक्कड व एक वायर कापण्याची पक्कड अशा हत्यारासह शिताफिने पकडून ताब्यात घेतले असून त्यांची नावे-
ONLINE PORTAL NEWS
१ ) राहूल कांताराम इचके , वय -२६ वर्षे , रा.सर्व्हे नं .१३६० , कवडेवस्ती , खांदवेनगर , वाघोली , पुणे
२ ) संदिप शिवाजी निचीत , वय -३० वर्षे , रा.ठुबे पठारे नगर खराडी , पुणे अशी आहेत .
सदरबाबत चंदननगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं .१८४ / २०२१ भा.द.वि.कलम ४५७ , ३८०,४२७,५११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून वरील आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे . दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा . पोलिस निरीक्षक- भालचंद्र ढवळे हे करीत आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.नामेदव चव्हाण पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे , मा.पोलीस उप – आयुक्त , परि -४ , श्री.पंकज देशमुख , मा.सहा.पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , श्री . किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक , गुन्हे , सुनिल थोपटे , सहा.पोलीस निरीक्षक , गजानन जाधव , सहा.पो.फौजदार युसुफ पठाण , पो.हवा.राजू कदम , पो.हवा.गणेश येळे , पो.हवा.सुनिल राउत , पो.ना.सचिन कळसाईत , पो.ना.संदीप पाटील , पो.ना.सागर तारू , पो.ना.मचिंद्र शिरसाठ , पो.ना.गुलाबचंद मरोट , पो.ना.परमेश्वर पाखरे , पो.शि.अविनाश पो.शि.समीर शेख , पो.शि.सुभाष आव्हाड पो . शि.विष्णू लष्कर , पो.शि.सतिश गिरे यांनी केलेली आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526