बनावट इन्शुरन्स तयार करुन आर.टी.ओ. पासिंगसाठी फसवणुक करणारे आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ ,गुन्हे शाखा ने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS बनावट इन्शुरन्स तयार करुन आर.टी.ओ. पासिंगसाठी फसवणुक करणारे आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा ने केली अटक अटक.
आज रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार पुर्व विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक ५५ दत्तात्रय खरपुडे यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळालेली आहे की , बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि . पुणे यांचे नावाचा लोगों व शिक्क्याचा वापर करुन , बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करुन एक इसम येरवडा व लोहगांव भागात ते बनावट पॉलिसीचे पेपर पियाजो , बजाज ऑटो रिक्षा , दुरीस्ट कार , टेम्पो व ट्रक अशा वाहनांचे मालकांना कमी पैशात , बनावट इन्शुरन्स तयार करुन आर.टी.ओ. पासिंगसाठी देत आहे व तशी एक बनावट इन्शुरन्सी पॉलिसीची प्रत प्राप्त झाल्याने सदर बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि . पुणे या कंपनीची फसवणुक होत असल्याची खात्री झाल्याने सदर कंपनीचे अधिकारी यांना संपर्क साधुन त्यांना वरील प्राप्त बनावट इन्शुरन्स पॉलिसीची प्रत दाखवुन ती बनावट असल्याची खातरजमा करून त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देवुन कारवाईच्या सुचना प्राप्त झाल्याने आमचे पथकाचे अधिकारी श्री विवेक पाडवी , सहाय्यक पोलीस निरीक्षक , श्री . गुंगा जगताप , पोलीस उप निरीक्षक व इतर स्टाफ यांना सुचना व मार्गदर्शन केले . त्याप्रमाणे दि . ०१ /०९ /२०२१ रोजी गांधीनगर , येरवडा , पुणे येथे एक इसम सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर्स घेवुन दुचाकी वरुन जाणार असल्याची बातमीदारा मार्फत बातमी समजल्याने वरील पोलीस अधिकारी व स्टाफ तसेच बजाज इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी यांचेसह सदर बातमीचे ठिकाणी सदर दुचाकी स्वारास पकडले असता त्याचे

नाव (संतोष विठ्ठल शिंदे , वय ४७ वर्षे , रा . स.नं. १०३. बुध्दविहार जवळ , गांधीनगर येरवडा पुणे )व पवार वस्ती , लोहगांव , पुणे

असे त्याने सांगितल्याने त्याचे कब्जात व त्याचे जवळील दुचाकी गाडीचे डिक्कीत असे एकुण ३४ बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे एकुण ६,३२,९४२ / – रु . चे बनावट पेपर मिळुन आल्याने बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे संबंधीत अधिकारी यांची फिर्याद घेवुन सदर इसमा विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ४२० , ४६७.४६८ , ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करुन , आज रोजी त्याची पोलीस कोठडीची रिमांड घेण्यात आली असता , त्या दरम्यान सदर आरोपीचे राहते घराची पंचा समक्ष घरझडती घेता त्याचे घरामध्ये सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करण्याकरीता वापरात येणारे लॅपटॉप , प्रिन्टर , शिक्के , स्टॅम्प पॅड , कोरी कागदे इत्यादी ३२,५०० / – रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . सदर अटक आरोपी याने या कामाकरीता कोणाची मदत घेतलेली आहे . त्याबाबत तपास चालु आहे . तसेच त्याने यापूर्वी किती लोकांना अशापध्दतीचे बनावट इन्शुरन्स पेपर वाटप केलेले आहे याबाबत तपास चालु आहे .


सदरची कारवाई ही मा . पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . सह पोलीस आयुक्त डॉ . श्री रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त साो . गुन्हे ( अतिरीक्त कार्यभार ) भाग्यश्री नवटके मॅडम , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पंधरकर , सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी , पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप , व पोलीस अमलदार उदय काळभोर , राजेश अभंगे , दिनकर लोखंडे , राजेश लोखंडे , विनायक रामाणे , गणेश लोखंडे , शिवाजी जाधव , दत्तात्रय खरपुडे , सुदेश सपकाळ व अमोल सरतापे यांनी केली आहे .

सुनिल पंधरकर
पोलीस निरीक्षक ,दरोडा वाहनचोरी विरोधी पथक – २. गुन्हे शाखा पुणे शहर .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *