देशी – विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई.

पोलीस महाराष्ट्र @ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय –

देशी – विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई.

दिनांक १९ / ०८ / २०२१ “ सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने विनापरवाना अवैधरित्या देशी – विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांची अवैधरित्या चारचाकी वाहनातून वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत

मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १८/०८/२०२१ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत स्पाईन सिटी चौक , मोशी पुणे येथील रितीक वाईन्सचा मालक कोरोना साथीचे अनुशंगाने वाईन्स शॉप मधून सकाळी दारू विक्री बंद असताना सुद्धा दारू विक्री करीत आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत स्पाइन सिटी चौक ते आरटीओ रोड चौक , संतनगर , मोशी , पुणे . येथे सकाळी ०८/०० वा . चे सुमारास एकुण ०४ वेगवेगळया चारचाकी वाहनांमधून काही इसम हे दारुची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचेवर सापळा रचुन छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

१ ) १,५९ .२०१ / – रु किं च्या देशी / विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या .

२ ) १०,३०,००० / – रु किं च्या मारुती वॅगनार अॅल्टो कार , एस क्रॉस , व टाटा इंडिका अशा एकुण ०४ चारचाकी कार असा एकुण ११,८९ , २०१ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे

१ ) सोमनाथ किसनराव रासकर वय ३८ वर्षे रा . प्लॉट नं ६० , सेक्टर नं ३ समर्थ नगरी , बंगला नं एच / ८ स्पाईन रोड भोसरी पुणे . २ ) दिगंबर मारुती गायकवाड वय ३९ वर्षे रा . पिर मंदिर जवळ , बर्गे वस्ती रोड , चिंबळी गाव ता.खेड जि . पुणे . ३ ) मंगेश बाळासाहेब शिवले वय ३१ वर्षे रा.गट नं १०० , राजमाता कॉलेज जवळ , डुडूळगाव , ता . हवेली जि . पुणे . ४ ) सुनिल बाळु देडे वय -२७ वर्षे रा . पत्राशेड रमाबाईनगर , भाटनगर , पिंपरी पुणे . याचेकडे दारू वाहतुकीचा कोणताही शासकिय परवाना नसतांना देशी / विदेशी दारुच्या व बियरच्या बॉटल या चारचाकी वाहनातून वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जातांना मिळून आले तसेच ५ ) पाहिजे आरोपी रितीक वाईन्स ( मालक ) ( पुर्ण नाव पत्ता माहित नाही ) याने त्यांचे वाईनशॉप मधून कोरोना या साथीच्या काळात लायसन्स परवाना नियम अटी शर्तीचे उल्लघंन करुन मोठया प्रमाणात नियमापेक्षा अधिक दारु विक्री केली ६ ) पाहिजे आरोपी नामे तुळजाई हॉटेलचे मालक नामे सचिन सस्ते नाव माहित नाही वय ३५ वर्षे रा . मोशी पुणे यांनी त्यांचे कामगारांना दारू आणणेस सांगीतले म्हणून त्यांचेविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ४३७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( ए ) . ( ई ) , ८२ , ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन करीत आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप – आयुक्त , ( मुख्यालय ) श्री . सुधीर हिरेमठ , मा . सहा . पोलीस आयुक्त डॉ . श्री . प्रशांत अमृतकर , सपोनि डॉ . अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके , पोलीस अंमलदार विजय कांबळे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , अनिल महाजन , जालिंदर गारे , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , संगिता जाधव , सोनाली माने यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *