Crime NewsLatest News

पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपी कडून पिस्टलसह अटक,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक ची कामगिरी,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक,

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक,नेहमी काय ना काही चर्चेमधी.कधी वाहन चोरी तर कधीही दरोडा कधी फरार असलेले आरोपी ची शोध घेताना पो.हवा. खरपुडे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक फरारी असलेला आरोपीस पिस्टल राउंड सह आरोपीला केली अटक ,

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल (मॅगझीनसह) व तीन काडतुस जप्त करण्यात आले आहेत कोंढवा येथील खडी मशिन चौकात पिस्टल विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.29 फेब्रुवारी) करण्यात आली.

प्रदीप उर्फ शप्पु जनार्दन कोकाटे (वय 34रा. वाघमळा, विठ्ठलवाडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार.पो.हवा. खरपुडे हे वानवडी, कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार, पाहिजे आरोपी चेकिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार पो.हवा. खरपुडे यांना माहिती मिळाली की,

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 पो.हवा. खरपुडे

अहमदनगर विसापूर जेल मधील पॅरोलवर सुटलेला व पॅरोल रजा संपलेली असतांना पुन्हा जेलमध्ये हजर न झालेला आरोपी पिस्टल विक्रीसाठी खडी मशीन चौक, कोंढवा येथे आलेला आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचुन ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला 40 हजार 600 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल (मॅगझीनसह) व 3 जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्या विरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट क 3(25) व महाराष्ट्र पोलीस कयदा 37(1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गु.रजि.नं. 103/2014 आयपीसी 302, 120(ब), 387,507 आर्म ऍक्ट क 3(25) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात विसापूर जिल्हा खुले कारागृह,अहमदनगर येथे शिक्षा भोगत आहे. दि.01/01/2024 रोजी 30 दिवसाच्या संचित रजेवर कारागृहा बाहेर आला होता व पुन्हा कारागृहात हजर झालेला नाही. याबाबत विसापूर जिल्हा खुले कारागृह, अहमदनगर यांचेशी संपर्क साधुन कळवले असल्याचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, पोलीस अंमलदार खरपुडे, रामाणे, लोखंडे, सपकाळ इंगळे यांच्या पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *