हडपसर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत हडपसर पोलीसांकडून अटक,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
एकाच दिवशी हडपसर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न व चंदननगर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत हडपसर पोलीसांकडून अटक “
दिनांक ०१.०३.२०२४ रोजी रात्रौ २०.०० वाजताचे सुमारास जखमी राहुल काळे वय ३९ वर्ष रा. मगरपट्टा हडपसर यांना आरोपी नामे शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून जिवे दार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३८७/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,३२६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्यचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे हे करीत आहेत.
दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांनी दिलेल्या सुचनांवरून हडपसर पोलीस स्टेशन तपासंपथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, अमोल दणके असे मिळुन आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या बातमीचे आधारे आरोपी शुभम काकासाहेब निचळ, वय २७ वर्ष, रा. समर्थ बैठक हॉल समोर, होळकरवाडी, पुणे यास हांडेवाडी परिसरातुन ताब्यात घेण्यात आले.
आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना त्याने सुरवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, त्याने हडपसर पोलीस ठाणे येथील वरिल नमुद गुन्ह्यासह काल दिनांक ०१.०३.२०२४ रोजी दुपारच्या सुमारास रिव्हरडेल सोसायटी जवळ, खराडी येथे त्याच्या ओळखीच्या इसम बाळु कांबळे यास धारदार शस्त्राने मारून खुन केलेला असल्याचे सांगीतले.
आरोपीने सांगीतलेल्या माहीतीवरून चंदननगर पोलीस स्टेशन येथून माहीती घेतली असता सदरबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १०६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे व त्यातील संशयीताच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नमुद आरोपी दिसत असल्याचे समजले.आरोपीकडे केले एकंदरीत तपासादरम्यान १) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३८७/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,३२६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ २) चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १०६/२०२४ भा.दं.वि.कलम ३०२ असे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर श्री. मनोज पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. संतोष पांढरे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. पंडीत रेजितवाड साो, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in