चितळे बंधु मिठाईवाले यांचेकडे वीस लाख रुपये खंडणी मागणा – या शिक्षिका असलेल्या महिलेसह तिचे तीन साथीदार जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

PUNE CHIFE EDITOR WAJID S KHAN

दिनांक – १७/०६/२०२१ युनिट – १ गुन्हे . पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक चितळे बंधु मिठाईवाले यांचेकडे वीस लाख रुपये खंडणी मागणा – या शिक्षिका असलेल्या महिलेसह तिचे तीन साथीदार जेरबंद

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

ग्राहक तक्रार मा . पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस सह आयुक्त पुणे यांनी पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जनतेच्या मालमतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड , दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे सराईत गुन्हेगार , यांचा शोध घेवुन त्यांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत .

ONLINE PORTEL NEWS ONLY POLICE

दिनांक – ०२/०६/२०२१ रोजी प्रसिध्द चितळे बंधु मिठाईवाले यांचे निवारण केंद्राकडे ग्राहक श्रीमती पुनम परदेशी यांनी ई मेल व्दारे दुधाबाबत तक्रार दिल्यानंतर वेळोवेळी प्रत्यक्ष व फोनवरुन दुधामध्ये काळया रंगाचा सदृश्य पदार्थ आढळुन आला आहे या बहाण्याने प्रत्यक्ष व फोनवर तुमच्या विरुध्द एफडीओ व पोलीसांकडे तक्रार करते . सदर प्रकरण लवकरात लवकर मिटवा , नाही तर तुमचे दुकान बंद करु , चालु देणार नाही , तुमची बदनामी करु , कोणालाही जिवंत सोडणार नाही अशा धमक्या दिल्या आहेत . त्यांचे धमक्यामुळे कंपनीने भितीपोटी घाबरुन जावुन त्यांना वीस लाख रुपये ( दोन हजार दराच्या बनावट नोटा असलेले एकुण दहा बंडल ) दिले ते स्विकारताना अनं १ ) श्रीमती पुनम सुनिल परदेशी वय – २७ रा – १०१ घोरपडी गाव बसंत हायस्कुल जवळ पुणे २ ) सुनिल बेनी परदेशी वय – ४९ रा – सदर ३ ) करण सुनिल परदेशी वय – २२ रा – सदर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे . तसेच त्यांचा साथीदार अक्षय मनोज कार्तिक यास भारत फोर्ज मुंढवा पुणे समोरुन ताब्यात घेण्यात आलेले आहे . श्रीमती पुनम परदेशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणुन काम करतात व सुनिल परदेशी व अक्षय परदेशी यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे . सदरबाबत मेसर्स बी .जी . चितळे डेअरी चे प्रतिनिधी सहायक मार्केटिंग व्यवस्थापक नामदेव बाबुराव पवार वय -६२ व्यवसाय – नोकरी रा – वी २०२ पारस रिव्हेरा शिवाजी चौक पिंपळे सौदागर पुणे – २७ यांनी पोलीसांकडे तक्रार दिलेली आहे सदरबाबत विववेवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे भारतीय दंड विधान कलम ३८८ , ३८९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे व त्यांना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे . अक्षय मनोज कार्तिक याचेविरुध्द यापुर्वी वानवडी व मुंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे सरकारी कामात अडथळा आणणे , दंगा मारामारीरचे तीन गुन्हे , सुनिल परदेशी याचेविरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे मारामारीचे दोन गुन्हे व करण परदेशी याचेविरुध्द मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे .

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे . १ श्री . सुरेन्द्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट – १ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . भरत जाधव , युनिट – १ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , अय्याज दडडीकर , इम्रान शेख , तुषार माळवदकर , महेश वामगुडे व महिला पोलीस अंमलदार मीना पिंजण यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

ONLINE PORTEL NEWS

CHIFE EDITOR WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *