पुण्यात चोरी बिहारमध्ये विक्री करणाऱ्या सराईत आरोपींना बिहारमधून अटक,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यात चोरी बिहारमध्ये विक्री करणाऱ्या सराईत आरोपींना बिहारमधून अटक,

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, हडपसर तपास पथक बिहारमध्ये जाऊन आरोपीला अटक करून २२ लाखाचा गुन्हा उघड,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे, दि.७ नोव्हेंबर,

आरोपी हे सर्व पुण्यातील असून, हडपसर कोंढवा कोथरूड या ठिकाणी मोबाईल चोरी करायचे व ते बिहारमध्ये असलेला आपला साथीदार याला विक्रीसाठी देत होते,

सर्व हकीगत पुढील प्रमाणे,,

दिनांक २३/१०/२०२२ रोजी ऊरळी देवाची ता.हवेली जि-पुणे येथील स्वप्नील सुभाष परमाळे यांच्या न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतील १९ लाख रुपयांचे १०२ मोबाईल चोरी झालेचा हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं २३२८ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७.३८०, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानामध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच दुकानाच्या बाहेरील बाजुस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळालेल्य बातमीवरून सदर ठिकाणी जावून साहिल अनिल मोरे वय २० वर्षे रा. देशमुखवाडी इंगळे कॉर्नर, शिवणे, पुणे, वास डुक्करखिंड, पुणे येथे एम.एच. १२ सी. के. ४२३६ या टाटा इंडिगो वाहनास ताब्यात घेतले त्यास पोउपनिरी आवनाश शिंदे यांनी पोलीस कस्टडीत विचारपुस करुन गुन्हयातील साथीदार संकेत निवगुणे, लक्ष्मण ऊर्फ आण्णा जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांची नावे निष्पन्न केली.

पोलीस कस्टडीतील चौकशीत आणखी एक आरोपी संकेत प्रकाश निवगुणे वय २२ वर्ष रा. बानगुडे चाळ, संघर्ष चौक, यशोदिप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे, यास ताब्यात घेऊन सदर गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण आण्णा जाधव हा चोरोतॉल मालासह एकमा पोलीस स्टेशन, जिल्हा, छपरा बिहार मधील एका गावात असल्याची शक्यता वाटल्याने वरीष्ठांच्या परवानगीने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर, भगवान हंबर्ड यांना तात्काळ रवाना करण्यात आले.

तसेच तपास पथकामधील सर्पानि विजयकुमार शिंदे व पौना संदीप राठोड याने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधार मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा आरोपी मोनुसिंग रा. विश्णपुरा काला थाना एकमा, जिल्हा सारण छप्रा, राज्य बिहार याचे बिहार मधील राहते घरी हडपसर पोलीसांनी छापा मारला असता

सराईत आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३, गोसावी वस्ती, कोथरूड पुणे हा सदर ठिकाणी गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ९७ मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यास गुन्हयामध्ये दिनांक- ०३ / ११ / २०२२ रोजी स्थानिक न्यायालयाकडून ट्रान्जीट रिमांड चुन दिनांक ०५/११/२०२२ रोजी मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो. लष्कर न्यायालयात हजर केलं.

तीनही आरोपी पोलीस कस्टडीत असुन अद्याप पर्यंत निष्पन हकीकत अशी की, पाहीजे आरोपी साहिल मोरे, गजानन

मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःश्रुंगी या भागातील मोबाईलची दुकाने फोडुन मोबाईल

लक्ष्मण आण्णा जाधव यास देत होते. सदरचे मोबाईल हे लक्ष्मण आण्णा जाधव त्याचा साथीदार मोनु सिंग रा. बिहार यास

विकत होता. मोबाईल विकून आल्यानंतर मोबाईलच्या किंमतीच्या ४० टक्के रक्कम ही आरोपीना मिळत होती.

अद्यापपर्यंत आरोपीकडून गुन्ह्यातील ९७ मोबाईल, इंडिका कार होंडा अॅक्टीवा दुवाको असा २२ लाखांचा मुद्देमाल

जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव वय ३४ वर्षे रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३ गोसावी वस्ती,

कोथरूड पुणे. हा पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहीजे आरोपी आहे.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहा.पो.आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे (गुन्हे), विश्‍वास डगळे (गुन्हे) यांचे आदेशाने सहा.पो.नि. विजयकुमार शिंदे, उपनि अविनाश शिंदे, पो.अं.सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर यांचे पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *