पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस पत्रकार खंडणी उकळल्या प्रकरणी ४ जणांना अटक मुंढवा पोलीस स्टेशनचे कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस पत्रकार खंडणी उकळल्या प्रकरणी ४ जणांना अटक मुंढवा पोलीस स्टेशनचे कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची धडाकेबाज कामगिरी.

पुण्यात बोगस खंडणीखोर पत्रकारांचा सुळसुळाट वाढला असून मोठ्या दैनिकाचे पत्रकार असल्याचे भासवून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. भेसळयुक्त अन्नधान्याची तक्रार करण्याची दमदाटी करून एकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाचे वृत्तपत्रातून बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या एका महिला संपादक सह ६ तोतया पत्रकारांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चौघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.


प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्षमणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच योगेश नागपूरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका दुकानाच्या गोदामात २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे.

तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करुन दोन नंबरचा धंदा करता.
यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खूप पैसा कमावला आहे. आता पेपर मध्ये बातमी लावून बदनामी करुन पूर्णपणे बरबाद करुन टाकतो. जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खूनच करुन टाकतो, अशी धमकी दिली.

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे.
प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर
हे थांबले होते. प्रमोद साळुंखे याने एका इंग्रजी वृत्तपत्र व आत्मज्योती पेपरचा पत्रकार असल्याचे सांगितले.

सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच  मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी आरोपी विरोधात कारवाई करत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद केला. यावेळी आरोपी (१). प्रमोद साळुंखे (२). वाजीद सय्यद (३). मंगेश तांबे (४). योगेश नागपुरे (५). लक्ष्मणसिंग तंवर (६). संजीवनी कदम सर्व रा. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी (१). प्रमोद साळुंखे (२). वाजीद सय्यद (३). मंगेश तांबे (४). योगेश नागपुरे यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई मुंढवा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, गुन्हे निरिक्षक काकडे, सपोनि करपे, उपनि बिनवडे, पोलीस कर्मचारी नाना भांदुर्गे, हेमंत झुरंगे, राहुल मोरे, राजू कदम, योगेश गायकवाड, वैभव मोरे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *