रात्री उशीरापर्यंत चालणा-या पिंपरी येथील सलोनी बार वर (पिंपरी चिंचवड पोलीस) सामाजिक सुरक्षा पथकाची बार वर कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD

पोलीस महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयला

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक २८/०८/२०२१ सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने रात्री उशीरापर्यंत चालणा – या पिंपरी येथील सलोनी बार वर कारवाई केलेबाबत . ”

मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २७/०८/२०२१ रोजी २३.४५ वा . पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साई चौक पिंपरी पुणे येथील सलोनी बारचे मालक राजेश लालवानी हे त्याचे सलोनी बार मध्ये गिहाईकांना बसण्यास परवागी देऊन शर्ति पेक्षा जास्त वेळ बार चालू ठेवुन बारमध्ये ३५ ते ४० लोकांना जमवुन मानवी सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करून , कोरोना या साथीच्या रोगाची संसर्ग पसरवण्याची हयगयीची कृत्य करीत आहेत . अशी बातमी मिळताच पिंपरी येथील सलोनी बार वरती कारवाई करण्यात आली आहे . सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन दिनांक २८/०८/२०२१ रोजी रात्री १२.३० वा . छापा टाकला असता एकुण ४६ ग्राहक बारमध्ये मिळून आले तसेच ७,१०० / – रू.कि. रोख रक्कमेचा मुद्देमाल आरोपी क्रमांक ०१ चे ताब्यात मिळुन आला म्हणुन इसम नामे

१ ) राजेश कनैय्या लालवानी वय ४८ वर्षे रा . पंचवटी सोसायटी , पिंपरी कॉलनी , पिंपरी , पुणे . ( बार मालक )

२ ) अराफत मोजरिम मंडल वय २४ वर्षे रा . साई चौक पिंपरी पुणे . ( वेटर )

३ ) हबीबुल माफीजुल शेख वय १ ९ वर्षे रा . सदर ( वेटर )

४ ) कौसीक अनारूल मुल्ला वय २१ रा . सदर ( कुक ) यांचे विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ६७७/२०२१ भा.द.वि. कलम १८८,२६९ .२७०,३४ साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३ , राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) महा.कोवीड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद असे . तसेच सदर हॉटेलमध्ये सुरक्षीत अंतर ठेवले नाही म्हणुन ४६ ग्राहकाकडुन एकुण २३,००० / – रु दंडाच्या शासकीय पावत्या केलेल्या आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ अति . कार्यभार पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री . आनंद भोईटे , मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . डॉ . प्रशांत अमृतकर , सपोनि डॉ . अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार सपोफौ कांबळे , पोहवा ५३५ शिरसाट , पोहवा ४२६ बर्गे , पोहवा लोंढे , पोना ४९१ मुठे , पोना १५३६ करचुंडे , पोना १७६८ कारोटे , पोना १२९७ गारे , मपोना १३७८ जाधव , मपोशि २५६९ माने यांनी केली आहे .

(आनंद भोईटे ) पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ अतिरिक्त कार्यभार पोलीस उप – आयुक्त ( मुख्यालय ) पिं.चिं .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *