पुणे शहर संशय घेते म्हणून बायकोचा केला खून आरोपीस मुंढवा येथून अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे शहर संशय घेते म्हणून बायकोचा केला खून आरोपीस मुंढवा येथून अटक.

ONLINE PORTAL NEWS 9822331526

समर्थ पोलीसांची कामगिरी . दि . १८/०६/२०२१ रोजी ७८९ , भवानी पेठ , सपकाळ कॉम्पलेक्स , फ्लॅट नं . ४०७ अगरवाल कॉलनी जवळ , पुणे या ठिकाणी कुलूप बंद घरात एका स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत पडलेला मिळून आला होता सदर प्रकरणी समर्थ पोलीस ठाणे पुणे येथे अकस्मात मयत दाखल करुन त्याबाबत तपास सुरु होता .

सदर प्रकरणाच्या तपासा दरम्यान सदर मयत महिलेचे नांव सुमय्या सलीम शेख व महिलेचा खून झालेचा संशय आलेने याबाबत मयत महिलेचे नातेवाईक व संशयित सलीम शेख याची लहान बहिण तसेच इतर साक्षीदार यांचेकडे केले तपासात मयत सुमय्या हिचा तिचा पती सलीम शेख याने गळा दाबून खून करुन तो घर कुलूप लावून बंद करुन पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर प्रकरणी दि . २९ / ६ / २०२१ रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . . गुन्हा केल्यापासून मयत महिलेचा पती नामे सलीम शकील शेख हा घर सोडून फरार झाला होता . त्याचा समर्थ पथक शोध घेत होते शोध घेत असतांना समर्थ पोलीस स्टेशनकडील पोलीस शिपाई हेमंत पेरणे व विठ्ठल चोरमले यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सलीम हा मुंढवा येथे स्मशानघाट भागात लपून बसला आहे . त्यांनी सदर बातमी वपोनिरी श्री विष्णू ताम्हाणे यांना सांगीतली असता , त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) उल्हास कदम , पोलीस उप निरीक्षक , विशाल मोहिते व तपास पथकातील कर्मचारी यांची टिम तयार करून बातमीचे ठिकाणी पाठविली . आरोपी सलीम हा पोलीसांना पाहून तेथून पळून जाण्याच्या तयारीत असतांना , त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडण्यात आले आहे . त्यास विश्वासात घेवून त्याचे नांव विचारता त्याने आपले नांव सलीम शकील शेख रा . सदर व मुंढवा भाजी मंडई जवळ , पुणे असे अंसलेचे सांगीतले . तसेच सलीम याचे यापूर्वीच लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत .दीड वर्षापूर्वी मयत महिला व आरोपी यांनी प्रेम विवाह केला होता .सलीम याची प्रथम पत्नी व मुले ही मुंढवा येथे तर मयत सुमय्या ही भवानी पेठ येथे रहात होते . मयत महिला हिला आरोपी सलीम याचे अन्य महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने त्यावरुन त्यांचेत सतत भांडणे होत असल्याने चिडून जाऊन सुमय्या हिला गळा दाबून मारलेबाबत सांगीतले व घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला होता . गुन्हा केल्यानंतर आपल्याला पोलीस पकडतील या भितीने आरोपी हा मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश , गुजरात भागात फिरत होता .

ONLINE PORTAL NEWS 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *