महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दलित पॅंथर तर्फे, गुन्हा दाखल करण्याची मागणी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दलित पॅंथर संघटनेतर्फे कात्रज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दिनांक 11/12/2022 रोजी

मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब , भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन , कात्रज , पुणे-

विषय भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी केलेल्या वादग्रस्त व बेताब वक्तव्य केल्याबाबत कात्रज चौकात दलित पंथर संघटनांनी तीव्र आंदोलन केले .

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व त्यांच्या विरोधात दलित पॅंथर संघटनेतर्फे कात्रज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले,जाहीर निषेध चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दलित पॅंथर तर्फे करण्यात आली होती. यासंबंधीचे निवेदन दि,११ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक भैरट साहेब यांना देण्यात आले. तसेच ना. पाटील यांच्यावर त्वरित कार्यवाही न केल्यास दलित पॅंथर कडुन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता,

या निवेदनात म्हटले आहे की, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणीवपुर्वक अवमान करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. राज्यपाल कोशारी, सुधांशु त्रिवेदी यांच्यासारख्या अनेक राजकारण्यांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असतांनाच व या वादग्रस्त वक्तव्याचा संपुर्ण बहुजन समाजातुन निषेध व्यक्त होत असतांना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दि.०९/१२/२०२२ रोजी पैठण येथील आयोजित कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु करण्यासाठी अनुदान मागितले नाही, तर भिक मागीतली आहे. अशा,प्रकारचे वक्तव्य करुन तमाम बहुजनांच्या भावना दुखावल्या आहेत.

तरी सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी व मदमस्त झालेल्या चंद्रकांत पाटलावर जाणीवपुर्वक महापुरुषांचा अवमान करुन सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी व सामाजिक तेढ निर्माण होईल. अशा प्रकारचे वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, व चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास दलित पॅंथर कडुन आंदोलने उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनात, दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली, संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष, श्री आकाश पायाळ, पुणे शहर माथाडी कामगार अध्यक्ष, शबानाताई मुलानी, पुणे शहर उपाध्यक्ष, श्री संतोष जगताप, पुणे शहर पश्चिम महाराष्ट्र, (महिला अध्यक्ष,) स्नेहा ताई माने, अनुसूचित जाती विभाग आणि इतर मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहुल निवेदन दिले,

शाई फेकणारा अटकेत , शूटिंग करणारा पत्रकार अटकेत , संरक्षण करणारे पोलिस निलंबित , आणि महापुरुषांची बदनामी करणारा मोकाट .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *