सराईत दोन गुन्हेगारांना गुलवर्गा , राज्य कर्नाटक , येथे जेरबंद ३ गुन्हे उघडकीस

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दि .३० / ०६ / २०२१ सिव्हील हॉस्पिटल , सोलापूर , येथुन खिडकीची जाळी तोडून पलायन केलेल्या अभिलेखावरील सराईत दोन गुन्हेगारांना गुलवर्गा , राज्य कर्नाटक , येथे जेरबंद ३ गुन्हे उघडकीस , रू .१,३५,००० / – किंमतीचा मुद्देमाल हस्तगत — गुन्हे शाखा , सोलापूर शहर यांची कामगिरी

ONLINE PORTAL NEWS

वळसंग पोलीस ठाणे , सोलापूर ग्रामीण यांनी वळसंग पोलीस ठाणे गुरनं -२६० / २०२१ भादंवि -३९९ या गुन्ह्यात आरोपी नामे विकास उर्फ विकी भिवा पवार , वय -२४ वर्षे , रा . रूपाभवानी मंदिर जवळ , सोलापूर , यास व वळसंग पोलीस ठाणे गुरनं -२५९ / २०२१ भादंवि -३७९ या गुन्ह्यात आरोपी नामे अजय सिद्राम चौघुले , वय -२३ वर्षे , रा . मु.पो. तडकल , जि . गुलबर्गा , राज्य – कर्नाटक , यांना अटक केले होते . सदर दोन्ही आरोपीची मा . न्यायालयानी न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केल्याने त्यांना जिल्हाकारागृहात जमा करण्यापुर्वी शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे कोरोना चाचणी करणेकामी वळसंग पोलीस ठाणे , सोलापूर ग्रामीण यांचेकडून आरोपींना सिव्हील हॉस्पिटल , सोलापूर , येथे नेण्यात आले होते . तेथे त्याना कोरोना चाचणी करणेकरिता प्रिझनर वार्ड मध्ये दि .२४ / ०६ / २०२१ रोजी अॅडमीट करण्यात आले असता दोन्ही आरोपींनी संडासला जाण्याचा बहाणा करून हॉस्पिटल मधील स्टाफची नजर चुकवुन प्रिझनर वार्डातील संडाच्या खिडकीची जाळी तोडून ते पळून गेल्याने सदर बझार पोलीस ठाणेस गुरनं -४०७ / २०२१ भादंवि -२२४ प्रमाणे गुन्हा दाखल होता . सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून नमूद गुन्ह्यातील अभिलेखावरील सराईत पाहिजे आरोपींना जेरबंद करणेबाबत आदेशीत केले होते . त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचे पोलीस उप – निरीक्षक शैलेश खेडकर यांना बातमीदारामार्फत आरोपी नामे विकास उर्फ विकी भिवा पवार व अजय सिद्राम चौघुले हे गुलबर्गा येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन तात्काळ पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक गुलबर्गा येथे रवाना होवुन पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे विकास उर्फ विकी भिवा पवार , वय -२४ वर्षे , रा . रूपाभवानी मंदिर जवळ , सोलापूर व अजय सिद्राम चौघुले . वय -२३ वर्षे , रा . मु.पो. तडकल , जि . गुलबर्गा , राज्य – कर्नाटक , हे मोटार सायकल वरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने पकडले व त्यांना सदर बझार पोलीस ठाणे गुरनं -४०७ / २०२१ भादंवि -२२४ या गुन्ह्यात दि .२९ / ०६ / २०२१ रोजी अटक केली . तसेच त्यांचेकडे अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की , ते सिव्हील हॉस्पिटल येथुन पळुन गेल्यानंतर त्यांनी राघवेद्र नगर . मुरारजी पेठ , सोलापूर , येथील एका घरासमोरील बुलेट मोटार सायकल क्र . एम.एच .१३ डी.के .४०७० ही चोरली असल्याचे व त्या मोटार सायकली मधील पेट्रोल उनदी , ता . जत , जि . सांगली येथे संपल्याने बुलेट मोटार सायकल तेथेच सोडून देवुन उमदी जवळील निगडी बुद्रुक येथील एका घरासमोरील हिरो स्प्लेंड प्लस मोटार सायकल क्र.एम.एच .१० डी.बी.९५६६ ही चोरी केली तसेच जिगजेनी गांवातील एका उघडया घरातुन रियलमी कंपनीचा मोबाईल चोरी करून चोरीच्या मोटार सायकल व मोबाईलसह दोघेजण गुलबर्गा येथे वास्तव्यास आले असल्याचे सांगितले . त्यानुसार अभिलेखाची पडताळणी केली असता बुलेट मोटार सायकल चोरी बाबत १ ) फौजदार चावडी पो.स्टे . गुरनं -४४५ / २०२१ भादवि -३७९ व स्प्लेंडर प्लस मोटार सायकल चोरी बाबत २ ) उमदी पो.स्टे . , सांगली येथे गुरनं -१३८ / २०२१ भादंवि -३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने आरोपीने चोरी केलेल्या २ मोटार सायकली व १ मोबाईल असा एकुण रू .१.३५,००० / किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असुन , आरोपी विकास ऊर्फ विकी भिवा पवार व अजय सिद्राम चौघुले हे सदर बझार पोलीस ठाणे गुरनं -४०७ / २०२१ भादंवि -२२४ या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याने त्यांना पुढील कारवाईकामी सदर बझार पोलीस ठाणेस हजर करून ३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत .

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त . सोलापूर शहर , श्री अंकुश शिदे साो , पोलीस उप- आयुक्त ( गुन्हे / विशा ) श्री . बापू बांगर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा श्री . संजय सांळुखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक शैलेश खेडकर , पोहेकों / अशोक लोखंडे , इमाम इनामदार , पोना / शंकर मुळे , राजेश चव्हाण , विजयकुमार वाळके , विद्यासागर मोहिते . संतोष येळे , पोशि / सुहास अर्जुन , चापोना / संजय काकडे , यांनी पोलीस आयुक्त , सोलापूर शहर यांचे करीता

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *