बुलेट बाइक सायलेन्सर वाहतूक विभागाची, कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवरती लष्कर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

बुलेट बाइक सायलेन्सर वाहतूक विभागाची, कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवरती लष्कर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे, दि. २ डिेसेंबर २०२२

शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकींचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना मोठा त्रास होत.

वाहतूक विभागाची, कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवरती कारवाई,

बुलेट बाइकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होतो.

हे लक्षात घेत कर्णकर्कश आवाज काढून स्टाईल मारणाऱ्या दुचाकीस्वारांना लष्कर वाहतूक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. दुचाकींचा सायलेन्सर काढून आतापर्यंत ६ दुचाकीस्वारांकडून कारवाईमार्फत कारवाई केली आहे.

बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई लष्कर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली आहे. दुचाकींना कर्णकर्कश आवाज यावा यासाठी पुणे शहरांमध्ये अनेक जणांनी दुचाकीच्या मूळ भागांमध्ये बदल करून विविध प्रकारचे सायलेन्सर लावले होते.


अखेर वाढत्या तक्रारी विचारात घेऊन लष्कर वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस कर्मचारी यांनी लष्कर विभागात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी , यांनी लष्कर विभागात संध्याकाळी संध्याकाळी चार वाजता सर्व बुलेटची टू व्हीलर गाड्यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले.

या आदेशाप्रमाणे शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये बुलेटचालकांना अडवून वाहनांना बसविलेल्या कर्णकर्कश भोंग्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अधिक बुलेटचालकांनी कर्णकर्कश भोंगे बुलटेला बसवून घेतले असल्याचे आढळले.

सध्या केवळ लष्कर विभागात मध्ये ही कारवाई दिसत असली,तरी पूर्ण पुणे शहरात ही कारवाई होऊ शकते. कारण शहरांमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचं फॅड दिसतं. काही दिवसापूर्वी गोळी झाडल्याचा किंवा फटाका वाजल्याचा आवाज काढण्याचं

बुलेटवाल्यांचा कारनामा सुरु होता. पोलिसांनी त्यावर कारवाई करुन त्याला जरब बसवली.मात्र बेदरकारपणे बुलेट चालवून कर्कश हॉर्न वाजवत पेट मारणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळेच जी मोहीम लष्कर वाहतूक विभाग पोलिसांनी हाती घेतली आहे, ती येत्या काळात राज्यभरात पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *