सात तोळे सोने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे,तपास पथकाची कामगिरी .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सात तोळे सोने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे,
पुणे, दि. ३ डिसेंबर.२०२२
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
रुक्साना रहीम शेख वय ४२ वर्ष रा. ओदुंबर कॉलनी, यशोनाम बिल्डींग, पापडे वस्ती, हडपसर पुणे, असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी .
याप्रकरणी सोमनाथ हरेश्वर जगदाळे, वय ३८ वर्ष, रा. रा. स्वप्न लोक अर्पाटमेंट, सी बिल्डींग, सातवा मजला, काळेपडळ रोड, पापडेवस्ती, फुरसुंगी, हडपसर, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
चोरी करताना चोराने कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा अफरातफर न करता केवळ दागिने लंपास केल्याने घराची माहिती असलेल्या व्यक्तिनेच चोरी केल्याचा संशय निर्माण झाला.
सोमनाथ जगदाळे दिनांक २७/ ११ / २०२२ रोजी मुलाचा वाढदिवस दापोली येथे साजरा करण्यासाठी दिनांक २५/११/२०२२ रोजी दुपारी १ च्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजा लॉक करुन गेले होते. वाढदिवस साजरा करून घरी परत आले होते. दिनांक ०१ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०९.२० वाजताचे सुमारास पुजेकरीता सोन्याचे दागिने लागणार असल्याने त्यांनी कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने पाहीले असता ते निळून आले नाहीत, त्याबाबत अज्ञात इसमाविरुध्द हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १५११ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी यांचे सातव्या मजल्यावरिल फ्लॅटचे बाहेरील कुलुप तसेच कपाटाचे देखील कोणतेही नुकसान अगर तोडफोड झालेली नव्हती. त्यामुळे फिर्यादी यांचे घरामध्ये येणाऱ्या लोकांपैकी कोणीतरी गुन्हा केला असावा ही शक्यता धरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरविंद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनि अविनाश शिंदे अंमलदार शाहीद शेख यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादी यांचे घरामध्ये कामासाठी महिला नामे रुक्साना मामी ही येत असल्याबाबत माहीती मिळाली.
त्याआधारे फिर्यादी यांचे घरामध्ये कामास असणारी महिला रुक्साना रहीम शेख वय ४२ वर्ष रा. ओदुंबर कॉलनी, यशोनाम बिल्डींग, पापडे वस्ती, हडपसर पुणे हिला पोलीस ठाणेस बोलावून घेवून तिचेकडे गुन्ह्याचा तपास केला परंतु उपयुक्त काहीही निष्पन्न झाले नाही.
तपास पथक टिमने तपास पुढे सुरू ठेवला. फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असलेले लिफ्ट मधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली गुन्ह्याचे दिवशी मोलकरीण रुक्साना ही ४ थ्या मजल्यावर लिफ्ट मधून बाहेर पडल्याने तपासाची लिंक जुळून येत नव्हती. त्याआधारे नमुद महिलेकडे पुन्हा तपास करता तिने तपासादरम्यान वेगवेगळी माहीती दिली. रुक्सानाच्या घराची घरझडती घेतली परंतु घरझडती मध्ये काहीएक मिळून आले नाही.
तपास पथकातील अंमलदार शाहीद शेख यांनी नमुद महिलेच्या घरातील व्यक्ती कोण कोण आहेत याबाबत माहीती घेत असताना नमुद महिलेच पती हा रिक्षा ड्रायवर असल्याबाबत समजले. व सदरची रिक्षा ही राहते ठिकाणी असल्याने महिलेसह तिचा पती समक्ष,पोलीस स्टाफ असे जावून रिक्षाची पाहणी केली असता त्यामध्ये रिक्षाचे मागिल बाजुस असलेल्या सिटखाली काही सोन्याचे दागिने मिळून आले.
त्यावेळेस महिलेने गुन्हा केल्याचे कबुल करून आपणच दागिने हे रिक्षामध्ये ठेवले असल्याचे सांगीतले. रिक्षामध्ये दागिने ठेवण्याचे कारण विचारले असता, कोणीही संशयाने घर चेक करू शकते मात्र महिलेच्या नवन्याची रिक्षा चेक करणार नाही याची खात्री असल्याने काही दागिने रिक्षात ठेवल्याची कबुली दिली. उर्वरित दागिन्याबाबत विचारपूस केली असता आरोपी महिला राहत असलेल्या यशोनाम बिल्डींगचे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या टेरेसवरील कचन्याच्या पडिक ड्रममध्ये रूमालात लपवले असल्याचे सांगीतले.नमुद आरोपी महिलेकडे फिर्यादी यांचे घरामध्ये कसा प्रवेश केला याबाबत विचारणा केली असता, तिने सांगीतले की, लिफ्ट मध्ये सीसीटीव्ही फुटेज असल्याचे माहीत असल्याने ती चौथ्या मजल्यापर्यंत लिफ्टने आली व नंतर जिन्याने सातव्या मजल्यावर चालत गेली. फिर्यादी यांचे फ्लॅटचे दरवाजाच्या दोन चाव्या असल्याने त्यातील एक चावी तिने तिच्याजवळ ठेवली होती. फिर्यादी हे बाहेरगावी गेल्यानंतर तिने त्या चावीचा वापर करून आत प्रवेश करून गुन्हा केला असल्याचे सांगतीले. नमुद आरोपी महिलेकडून ६ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, नथ, असे ७ तोळे सोने व श्री स्वामी समर्थांचा चांदीचा मुकुट असा किं.रू ३,५०,००० / चा माल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामेश्वर नवले हे करीत आहेत .
सदरची कामगिरी ही मा. श्री. नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, शाहीद शेख यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526