येरवडा पोलिस ठाण्यात खंडणी मागणीप्रकरणी दोन सराईत आरोपींवर गुन्हा दाखल,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
येरवडा पोलिस ठाण्यात खंडणी मागणीप्रकरणी दोन सराईत आरोपींवर गुन्हा दाखल,
पुणे – शहरातील एका जाहीरात व्यवसायिकाकडून भागीदाराविरोधात तसेच इसमाविरोधात आर्थिक फसवणूक, धमकी आणि खंडणी मागणीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार नवेद मुज खान यांनी “बहेनिका इंटरनॅशनल” या नावाने पुण्यात जाहीरात फलक व्यवसाय चालवित होते. 2020 पासून त्यांनी आणि आरोपी आतिफ इरफान शेख यांनी “श्री गजानन अॅडव्हर्टाइजर्स” या नावाने भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. कालांतराने आर्थिक मतभेद निर्माण झाल्यानंतर वाद निर्माण झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतु, येरवडा येथील उड्डाणपुलावरील जाहीरात फलकांच्या मिळकतीच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपी आतिफ शेख यांनी तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून तब्बल ₹२५ लाखांची खंडणी मागितली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदाराने सांगितले की, आरोपींनी धमक्या देत शारीरिक इजा करण्याचीही भीती दाखवली होती. आरोपी अजय शिंदे यानेही या कटात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आरोपींवर भादंवि कलम 406, 420, 384, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. स्थान: येरवडा, पुणे
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
