ऑनलाईन शॉपींग / पेमेन्ट करताना फसवणुक झाल्यास , नागरीकांनी सायबर सेलला संपर्क करा
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
११/०७/२०२१ सायबर पोलीस स्टेशन , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडुन नागरीकांना आवाहन ऑनलाईन शॉपींग / पेमेन्ट करताना फसवणुक झाल्यास , नागरीकांनी ( Golden Hours ) मध्ये पुणे शहर सायबर पोलीस स्टेशनकडून प्रसिध्द केलेल्या वॉट्सअप मो.क्र . ७०५८७१९३७१ / ७०५८७१९३७५ वर संपर्क साधावा .
ONLINE PORTAL NEWS 9822331526
सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे . त्यामध्ये वेगवेगळया पध्दतीने पिडीतांचे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करुन पैसे काढून घेतले जातात . नागरिकांना तात्काळ तक्रार कोठे करायची याची पुर्ण माहिती नसल्याने सायबर पोलीसांपर्यंत पोहचण्यास विलंब झाल्याने फसवणूक करणारा इसम ते पैसे त्याचे बॅक / वॉलेट मधून काढून घेतो . फसवणूक करणारे इसम जगाच्या पाठीवर कोठेही बसून असे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार करु शकतो . त्यामुळे असे सायबर गुन्हे हे वेळीच रोखले जावेत व नागरिकांचे आर्थिक / मानसिक नुकसान होऊ नये आणि सायबर गुन्हयाविषयी जनजागृती व्हावी म्हणून
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
मा.पोलीस आयुक्त साो , पुणे शहर यांनी दिनांक १०/०७/२०२१ रोजी त्यांचे ट्विटर अकाउंटवरून वरील दोन मोबाईल क्रमांक प्रसारीत केले आहेत . पुणे शहरातील नागरीकांची ऑनलाईन फसवणुक झाल्यास ,
त्यांनी तात्काळ ( Golden Hours ) , सायबर पोलीस स्टेशन येथे वॉट्सप हेल्पलाईन क्रमांक ७०५८७१९ ३७१ / ७०५८७१९३७५ यावर संपर्क साधून त्यांचे सोबत फसवणूकीचा झालेला प्रकार सांगावा . त्यानंतर सायबर पोलीस त्या फसवणूकीचे व्यवहाराची कोणती माहिती पोलीसांना पुरवायची ते सांगतील . त्यानंतर ते व्यवहार थांबविण्यासाठी झालेल्या फसवणूकीच्या व्यवहाराचे स्क्रीनशॉट्स , डेबिटबाबत प्राप्त झालेले मॅसेजेस , बॅकेचे नाव , खाते क्रमांक , डेबीटकार्ड / क्रेडीटकार्ड क्रमांक व लिंक मोबाईल नंबर इत्यादी माहिती सायबर पोलीसांचे या क्रमांकाचे वॉट्सअपवर पुरविल्यास सायबर पोलीस फसवणूकीत त्यांचे खात्यातून वळती झालेली रक्कम देशभरातील संबंधीत बॅक / वॉलेट मध्ये गोठवून ठेवण्यासाठी कळवितात . त्यामुळे नागरिकांचे झालेल्या फसवणूकीतील व्यवहारातील पैसे परत मिळवता येतात . नागरिकांचे सोईसाठी वरील दोन संपर्क क्रमांक पुर्ण वेळ चालू राहणार असून फसवणूक झालेनंतर तात्काळ संपर्क साधल्यास फसवणूकीची रक्कम परत मिळविण्याची शक्यता जास्त असून विलंब केल्यास फसविणारे त्यांचे खात्यातून ती रक्कम काढून घेतात त्यामुळे त्या रक्कमा पुन्हा मिळविण्यास अवघड होते .
प्रथम पोलीसांना ही माहिती या क्रमांकावर दिल्यास फसवणूकीचे व्यवहार थांबविता येतात व यथावकाश त्यासंबंधी पोलीसात तक्रार दाखल करता येईल . नागरिकांसोबत दुर्दैवाने ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार घडल्यास , त्यांना तात्काळ संबंधीत सायबर पोलीसांना कळविण्यासाठी या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती होणे आवश्यक आहे . याकरीता आपल्या माध्यमातून जनजागृती व्हावी या अनुषंगाने या हेल्पलाईन क्रमांकास जास्तीत जास्त ठळक प्रसिध्दी दयावी ही विनंती .
नागरीकांना पुणे पोलीसांकडुन आवाहन – – नागरिकांनी कोणाचेही सांगणेवरुन मोबाईल क्लोन अॅप डाऊनलोड करु नये . कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये . मोबाईलवर आलेला ओटीपी , क्रेडीट – डेबीट कार्डची माहिती शेअर करु नये .
तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ वरील क्रमांकावर संपर्क साधावा , संबंधीत बॅकेचे अधिकृत हेल्पलाईन खात्रीशीर माहित असल्याशिवाय माहिती देवू नये . गुगल सारख्या सर्च इंजिन वरील कस्टमर केअरचा क्रमांकावर माहिती देवू नये , तो क्रमांक चोरटयाने रजिस्टर केलेला असू शकतो .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सायबर पो.स्टे.फोन नंबर ०२० / २९७१००९७ हेल्पलाईन क्र . ७०५८७१९ ३७१ / ७०५८७१९३७५ ई – मेल- crimecyber.pune@nic.in
सायबर फसवणूक झाली आहे? मग आधी स्क्रीनशॉट घ्या!
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526