Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

पुणे शहर मुंढवा परिसरामध्ये चालणा -या अवैध हुक्का पार्लरवर वर गुन्हे शाखेचा छापा १० जणांवर गुन्हा दाखल.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अवैध हुक्का पार्लरवर वर पुणे शहर गुन्हे शाखेचा छापा १० जणांवर गुन्हा दाखल.

पुणे शहर मुंढवा परिसरामध्ये चालणा – या अवैद्य हुक्का पार्लरवर धडाकेबाज कारवाई १० इसमांवर गुन्हा दाखल करुन एकुण ७८,३०० / – रुपये किंमतीचा तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर व साहित्य जप्त.

पुणे,दि.१६: पुणे परिसरातील मुंढवा येथे अंमली पदार्थ विरोधी पथक -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करुन मुंढवा हद्दीत पेट्रालिंग करीत असताना हॉटेल बॉटल फॉरेस्ट ताडीगुत्ता चौक धायरकर वस्ती मुंढवा पुणे व हॉटेल ब्ल्यु शॅक धायरकर कॉलनी , पिंगळे वस्ती मुंढवा पुणे येथे सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर वर गुन्हे शाखे १ च्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने छापा टाकाला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल करुन ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मुंढवा येथील घोरपडी रोडवरील हॉटेल बॉटल फॉरेस्ट आणि हॉटेल ब्ल्यु शॅक याठिकाणी गुरुवारी (दि.१५) केली.पोलिसांनी हॉटेल बॉटल फॉरेस्ट हॉटेल मालक

रोहित किसन (वय-२९ रा. घोरपडी गाव), हॉटेल व्यवस्थापक देवराम मांगिलाल जैन (वय-३२ रा. रविवार पेठ), वेटर सरोज लालमुखीया कुमार (वय-१९ रा. पाषाण), गोविंद सुरेंद्र मुखीया (वय-१९ रा. मुंढवा), पवन मुखीया जोगिंदर मखीया (वय-२२ रा. मुंढवा) हे ग्राहकांना अवैधरीत्या हुक्का पुरवून त्याठिकाणी हुक्का बार चालवत होते. त्यांच्याकडून ३३ हजार ३०० रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच हॉटेल ब्ल्यु शॅक या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल चालक अभय दिवाकर मिश्रा (वय-४१ रा. कुर्ला पश्चिम), ग्राहकांना सर्व्हिस देणारे अशोककुमार गौड (वय-२२ रा. धायरकर वस्ती, ताडीगुत्ता, पुणे), गोलु निहरी रामकुमार (वय-२० रा. धायरकर वस्ती, पुणे, मुळ रा. उत्तर प्रदेश), बाबु कालु शेख (वय-२८ रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. उडीसा),
भरत उत्तीमलाल कामत (वय-३९ रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. बिहार)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हे ग्राहकांना तंबाखुजन्य हुक्का पुरवत होते.
त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईतील आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे
महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर पोलीस अंमलदार संदिप जाधव, संतोष देशपांडे, संदिप शिर्के,प्रविण उत्तेकर, चेतन गायकवाड, रेहाना शेख, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, मारुती पारधी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *