मटका जुगाराचा खेळ , पोलिसांचे दुर्लक्ष का ?

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

क्राईम चालू घडामोडी पोलीस.

पुणे रेल्वे स्टेशनजवळ भररस्त्यात चालतोय मटका जुगाराचा खेळ , पोलिसांचे दुर्लक्ष का ?

पोलिस आयुक्तांनी दोन नंबरचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असले तरी आज आयुक्तांच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .

( 1 ‘ मटक्याची चिठ्ठी ‘ “

1 ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालू आहे त्या अवैध धंद्याना पोलिस ठाण्याच्या ” वसूली वाल्यांचीच ” मेहरबानी असल्याचे बोलले जात आहे .

रेल्वे स्टेशन येथील एसटी स्टँड शेजारील फुटपाथवर बिनधास्तपणे मटका जुगार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे . फुटपाथवरच सदरील मटक्याचा धंदा चालू असल्याने नागरिकांना फुटपाथ सोडून चालावं लागत आहे .

ज्या ठिकाणी अवैध मटका जुगार चालू आहे त्याच हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन पोलिस चौकी असतानाही पोलिसांच्या निदर्शनास आले कसे नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे . वर्दळीच्या ठिकाणी राजरोसपणे जुगार अड्डा चालू असून त्या ठिकाणी एसटी स्टँड , नागरिक सुविधा केंद्र , रेशनिंग कार्यालय व इतर शासकीय असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . विषेश म्हणजे त्या ठिकाणी गर्दी उसळत असल्याने काही नागरिकांना वाटतंय की रेल्वेच्या टिकीट मिळताहेत की काय ? परंतु तेथे विचारणा केल्यावर माहित पडते तेथे मटक्याच्या अवैध जुगार अड्डा चालू आहे . परंतु कोणाच्या “ मेहरबानी ” ने सदरील धंदा चालू आहे त्याच्यावर पोलिस आयुक्त कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे . तर ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. लवकरच याचा उलगडा करणार आहे .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *