बंड गार्डन पोलिसांकडून दुचाकी व मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश बंडगार्डन पोलीसांनी केली धडक बाज कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०७/०६/२०२२ बंडगार्डन पोलीस स्टेशन , पुणे शहर

बंड गार्डन पोलिसांकडून दुचाकी व मोबाईल
चोर टोळीचा पर्दाफाश बंडगार्डन पोलीसांनी केली धडक कामगिरी

गांज्याचे व दारूचे व्यसनापायी एका इसमाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जबरी चोरी करणा – या दोन सराईत गुन्हेगारांकडून एकूण ०४ मोबाईल व ०९ दुचाकी हस्तगत करून जबरी चोरीचे व वाहन चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळून बंडगार्डन पोलीसांनी केली धडक कामगिरी .

. दि .०४/०६/२०२२ रोजी पुणे स्टेशन बिट मार्शलवरील पो . अंम धुलागुडे हे पुणे स्टेशन परिसरात सतर्कपणे गस्त घालत असताना दोन इसम पुणे एस.स्टी.स्टॅण्ड समोर असणा – या टप – यांच्या आडबाजूस थांबून गप्पा मारत संशयीत रित्या उभे असल्याचे दिसल्याने त्यांनी लगेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री.राहूल पवार यांना फोनद्वारे माहीती देवून त्यांच्यावर पाळत ठेवली . काही वेळातच तपास पथकातील प्रताप गायकवाड व हरिष मोरे हे सदर ठिकाणी गेले असता ते संशयीत इसमांच्या दिशेने जात असताना त्यांना ते पोलीस असल्याचा संशय आल्याने त्या दोघांपैकी एक इसम त्याच्याकडील दुचाकी जागीच सोडून तेथून रोडच्या उलट्या दिशेने मालधक्का चौकाकडे पळून गेला .

दुस – या इसमास पोलीसांनी त्यास जागीच पकडून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे

नाव दिनेश हरकाबहादुर विका , वय -२५ वर्षे , रा . भोसरी , पुणे व तांगडे वस्ती , पिरंगुट , पुणे असे सांगितले .

त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील दुचाकीच्या मालकी हक्काबाबत तसेच त्याच्याशी गप्पा मारत थांबलेला व त्यांना पाहताचा पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पुढील चौकशीकामी त्यास त्याच्या ताब्यातील दुचाकी व त्याच्या साथिदाराने सोडून दिलेली दुचाकीसह बंडगार्डन पो.स्टे . येथे घेवून येवून त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता , त्यांच्याकडे मिळालेली निळया रंगाची होंडा कंपनीची अॅक्टिवा दुचाकी तिचा रजिस्टर क्र . एमएच १२ टीएल ८३४० ही बंडगार्डन पो . स्टे . गु.रजि.क्र .७० / २०२२ , भा.दं.वि.क .३७९ मधील चोरीस गेलेली दुचाकी असल्याचे तपासात निष्पन्न झाले .

नमुद गुन्ह्यात आरोपी नामे दिनेश विका यास अटक करण्यात आली आहे . अटक आरोपीने त्याच दिवशी देहूरोड व चाकण पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाच्या डोक्यात कोयत्याने वार करून अन्य दोन इसमांकडून त्यांचे मोबाईल जबरी चोरी करून आणल्याची कबुली देवून त्याच्याकडे मिळालेली दुचाकी ही त्याचा पळून गेलेला मिञ नामे खंड्या याच्यासह चोरल्याचे कबुल केले असून पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपीकडून पाहिजे

आरोपी खंड्या उर्फ रुषीकेश राजु विठुबोणे वय २४ रा . खंडेवस्ती भोसरी पुणे याची माहीती घेवून त्याच्या मदतीने त्यास दि .०६ /०६ / २०२२ रोजी भोसरी या ठिकाणाहून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे . अटक आरोपींनी पुणे शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचा साथिदार पाहिजे आरोपी नामे निखील याच्या मदतीने एकूण ० ९ दुचाकी चोरी केल्या असून त्यांच्याकडून चोरीचे ०४ मोबाईल व ०९ दुचाकी असा एकूण सुमारे ०४ लाख रूपयेंचा मुद्देमाल हस्तगत करून पुणे शहरातील वेगवेगळया पोलीस स्टेशनचे एकुण १० दाखल गुन्हे उघडकीस आणले आहेत .

नमुद कारवाई मा . अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम विभाग ,श्री राजेंद्र डहाळे ,मा.सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ श्री . आर .एन .राजे , सपोआ लष्कर विभाग , पुणे , श्री .प्रताप मानकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार , पोलीस उप निरीक्षक तसेच सहा . फौजदार , मोहन काळे तपास पथकाचे पोलीस अंमलदार , हरिष मोरे , प्रताप गायकवाड , नितीन जगताप , सुधीर घोटकुले , अनिल कुसाळकर , अमोल सरडे , संजय वणवे , सागर घोरपडे , किरण तळेकर व राजू धुलागुडे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *