पेट्रोलिंग करताना पोलिसांना सापडले वाहन चोर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS
गुन्हे शाखा, दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २, पुणे शहर
कडील पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप हे स्टाफसह पुर्व विभागात वाहन चोरीस आळा घालण्याच्या दृष्टीने कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोना शिवाजी जाधव, पोना मनोज खरपुडे, यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सोमजी बसस्टँड चौक कोंढवा पुणे येथे संशयित मोटर सायकल विकण्यासाठी येणार आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही सदरची बातमी आमचे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांना कळविले, त्यांनी सदर कारवाई कामी योग्य त्या सुचना दिल्या.त्याप्रमाणे आम्ही स्टाफसह सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसमास सदर मोटरसायकल सह शिताफीने पकडले.सदर इसमास त्याला त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव इस्माईल उर्फ समीर शफी सय्यद वय ४६ रा.लक्ष्मीनगर, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगितले.त्यास सदर संशयित मोटर सायकल बाबत विचारले असता कोणतीही कागदपत्रे अगर मालकीबाबत उपयुक्त माहिती न मिळाल्याने आम्ही त्यास पुढील कारवाईसाठी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक कार्यालयात घेऊन आलो. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्याने सदर संशयित मोटर सायकल ही मरळ वजन काटा , कोंढवा येथील एका सोसायटीसमोरून चोरल्याचे कबूल केले तसेच त्याने आणखी दोन गाड्या चोरल्याचे देखील चौकशीत कबूल केले.त्याप्रमाणे खालील गुन्हे उघडकीस आणून एकूण ६८,००० रूपये किंमतीचा मूद्देमाल निवेदन पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

CHIEF EDITOR WAJID S KHAN
१) लष्कर पो स्टे गु र क्रं २४८/२०२० भा द वि कलम ३७९
२) सासवड पो स्टे गु र क्रं १९०/२०२१ भा द वि कलम ३७९ .
तसेच त्याचे कब्जात मिळून आलेल्या गाडीचे फिर्यादीचा शोध घेऊन कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे, तसेच सदर आरोपी मजकूर यास पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

ONLINE PORTAL NEWS
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. अशोक मोराळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. श्रीनिवास घाडगे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. लक्ष्मण बोराटे सर , पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे ,विनायक रामाणे,मनोज शिंदे ,शिवाजी जाधव,मनोज खरपुडे ,संभाजी गंगावणे दरोडा वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN
9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *