गुन्हे शाखा युनिट – ६ , पुणे शहर दरोडयाच्या तयारीत असणा – या टोळीस युनिट ६ ने केले जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ०५/०७/२०२१ गुन्हे शाखा युनिट – ६ , पुणे शहर दरोडयाच्या तयारीत असणा – या टोळीस युनिट ६ ने केले जेरबंद

ONLINE PORTAL NEWS

दिनांक ०४/०७/२०२१ रोजी युनिट ६ कडील पोलीस पथक हद्दीमध्ये गस्त करीत असताना पो शि . २९६१ ऋषिकेश व्यवहारे व पो . शि . ८१५९ ऋषिकेश ताकवणे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारार्फत माहिती मिळाली की , गुन्हेगारी अभिलेखावरील दत्ता गायकवाड व त्याचे साथीदार हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोणीकंद ते बकोरी रोडवरील खंडोबा मंदिराजवळ अंधारात रस्त्याने येणारी जाणारी वाहने तसेच पादचा – यांना लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची माहिती श्री गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा , युनिट ६ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे १ ) दत्ता रंगनाथ गायकवाड , वय २३ वर्षे , रा . लेन नं १३.दुबेनगर , वाघोली , पुणे , २ ) गौरव अर्जुन परजणे , वय २० वर्षे , रा . लेन नं १३.दुबेनगर , वाघोली , पुणे , ३ ) किशोर विश्वनाथ जाधव , वय २२ वर्षे , रा . गुरूकृपा आश्रमच्या पाठीमागे , दुबेनगर , वाघोली , पुणे . ४ ) दत्ता बबन व्यवहारे , वय ३७ वर्षे , रा . फ्लॅट नं ३०४ , इमराल्ड को . हौ . सो . , लोहगाव चौक , वाघोली , पुणे यांना ताब्यात घेतले . त्यांच्याकडे छर्रे मारण्याचा गावठी कट्टा , लोखंडी कोयता , चाकू , मिरची पूड , दोन दुचाकी , नायलॉन दोरी , मोबाईल फोन असा एकूण १,१५,७३६ / – रु चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या विरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु . र . क्र . ३५०/२०२१ भादवि कलम ३९९ . ४०२ सह आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी क्र .०१ व आरोपी क्रं ०३ यांच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत .

१ ) चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८ / २०१८ भादवि कलम ३७९

२ ) लाणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. १००२ / २०१९ भादवि कलम ३९५ , ४५२ , १४३ , १४७ , १४८ , १४९ . ३३६ , ३२४,३२३ , ४२७ , ५०४ , ५०६

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर , श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री श्रीनिवास घाडगे , मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , सचिन पवार , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे , नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *