गुन्हे शाखा युनिट -३ , चीकामगिरी पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल सकट आरोपी अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
गुन्हे शाखा युनिट -३ , चीकामगिरी पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल सकट आरोपी अटक.
दि . ३०/०८/२०२१ सराईत गुन्हेगार गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक , गुन्हे शाखा युनिट -३ , ची कारवाई
मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा.पोलीस सह आयुक्त व अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नष्ट व्हावी व गुन्हयांना प्रतिबंध व्हावा याकरीता पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार यांना चेक करुन त्यांचे विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आदेशीत केले आहे . वरिष्ठांचे आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अभय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ३ चे पथक दि .२९ /०८/२०२१ रोजी कोथरुड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत फिरत असताना पोलीस अंमलदार राकेश टेकावडे यांना मिळालेल्या बातमीवरुन रेकॉर्डवरील गुन्हेगार (अशोक बाळासाहेब काजळकर वय २७ वर्षे रा.लेन नं ०८.सुतारदरा कोथरुड पुणे) . यास कोथरुड , लोहीया जैन आयटी पार्क समोर पुणे येथून ताब्यात घेतले . त्याचे ताब्यातून एक गावठी बनावठीचा पिस्टल असा एकूण ४०,००० / – रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला असून त्याचे विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. १८3/२०२१ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नमूद आरोपीत हा कोथरुड पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी , खुनाचा प्रयत्न , अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी , पोलीस उप- आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री . श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त , प्रतिबंधक गुन्हे , श्री.सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . अभय महाजन , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे , व पोलीस अंमलदार- राजेंद्र मारणे , विल्सन डिसोझा , राकेश टेकवडे , सोनम नेवसे यांनी केली आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक , युनिट -३ , गुन्हे शाखा पुणे शहर ,
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526