पेट्रोलिंग करत असताना वर्षापासून फरार आरोपीला केली अटक युनिट – १ गुन्हे शाखे ची चांगली कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD

दि .३० / ०८ / २०२१ पर्वती दर्शन भागातील एक वर्षापासुन फरार सराईत गुंडास १ पिस्टल व १ जिंवत काडतुसासह युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडुन जेरबंद .

दिनाक – १६/०८/२०२० रोजी युनिट – १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट -१ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना सुरज अडागळे हा सराईत गुन्हेगार पिस्टल घेवुन संशयरित्या फिरत आहे त्यास ताब्यात घेवुन १ गावठी बनावटी चे पिस्टल मॅगझीनसह , १ जिंवत काडतुस जप्त करुन त्याचेविरुध्द समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १००५/२०२० आर्म अॅक्ट क ३ (२५) व महा.पो.अधि . क ३७ (१ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यावेळी त्याचे कडे तपास केला असता सदरचे पिस्टल हे महेश उर्फ मिटया नवले याने दिले असल्याचे सांगितले होते सदर गुन्हयात महेश उर्फ मिटया नवले हा एक वर्षा पासुन फरार होता . दि .२७/ ०८/२०२१ रोजी युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट -१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार व इम्रान शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत १ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे मिटया नवले हा विणकर सभागृह यशवंतनगर , घनकवडी पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन परवानगीने युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेश उर्फ मिटया राजेंद्र नवले वय २३ रा.९ पर्वती दर्शन पुणे . असे असल्याचे सांगितले.त्यांस विश्वासात घेवुन सुरज अडागळे याला दिलेल्या पिस्टल बाबत तपास करता त्याने त्यास १ पिस्टल दिल्याचे कबुल केले व माझ्याकडे १ पिस्टल व १ जिवंत काडतुस घरात लपवुन ठेवले असल्याचे सांगितल्याने त्याचे घरातुन पंचासमक्ष ४१,००० / – रु.किंचे एक गावठी बनवटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर आरोपी याने सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे या बाबत अधिक तपास करता त्याने सांगितले आरोपीने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता त्याच्या पासुन जिवाला भिती असल्याने सदरचे पिस्टल ठेवले होते अशी माहिती पोलीसांना दिली आहे . सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न , मारामारी , जवर दुखापत , दरोडयाची तयारी , हत्यार बाळगणे , तडीपार आदेशाचा भंग करणे असे एकुण ९ गुन्हे दत्तवाडी , सहकारनगर स्वारगेट , शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत .

सदरची कामगिरी आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहरचे पोलीस उप आयुक्त श्रीमती भाग्यश्री नवटके ( अति . कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे ) . पुणे गुन्हे शाखा पुणे शहर चे पोलीस उप आयुक्त गुन्हे . श्री श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशना खाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उप – निरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , इम्रान शेख , राहुल मखरे , आय्याज दड्डीकर तूषार माळवदकर , महेश बामगुडे व मीना पिंजन यांनी केली आहे .

( शैलेश संखे ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *