आर्मीमध्ये नोकरीला लावतो असे सांगुन त्यांचेकडुन अंदाजे ५० लाख आर्मी ऑफिसर बिबवेवाडी तपास पथकाच्या ताब्य

ACS POLICE CRIME ONLINE PORTAL NEWS

तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्या नातेवाईकांना आर्मी भरतीचे आश्वासन देउन लाखो रूपयांची फसवणूक करणारा तोतया आर्मी ऑफिसर बिबवेवाडी तपास पथकाच्या ताब्य

ONLINE PORTAL NEWS

महिला नामे वैष्णवी पुरषोत्तम वाघमारे रा . मु.पो. आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिल्याने पोलीस ठाणेस भा.दं.वि.क. ४०६,४२०,४१९ , १७०,१७१,१४० प्रमाणे गुन्हा नोंद केला दाखल गुन्हयातील फिर्यादी यांच्या आईस रक्तदाब व शुगरचा आजार असल्याने चिंतामणी हॉस्पीटल बिबवेवाडी पुणे येथे उपचार कामी घेवुन आल्या होत्या त्यावेळी औषधे घेवुन चिंतामणी हॉस्पीटल समोरील रोडवर थांबले असताना आरोपी( नामे योगेश दत्तु गायकवाड ), वय- २७ वर्षे , रा.मु.डोंगरगाव , पो.नाचनवेल् , ता . कन्नड , जि . औरंगाबाद , याच्या पँटच्या पाठीमागील ख्रिश्यातुन आधारकार्ड पडल्याने ते देणेसाठी फिर्यादी यांनी त्याला आवाज देवुन त्याचे आधारकार्ड पडल्याचे सांगुन त्याचेकडे दिले . त्यावेळी त्याने फिर्यादी यांना सांगितले की , बरं झाल तुम्ही माझे पडलेले आधारकार्ड मला परत दिलं , माझे नाव योगेश दत्तु गायकवाड , मी आर्मीमध्ये पॅरा कंमाडो या पदावर असुन आम्हाला नेहमी आधारकार्डची गरज असते असे सांगुन त्याने त्याचे आर्मीचे आयकार्ड दाखवुन काही अडचण असल्यास मला फोन करा असे सांगुन त्याचा फोन नंबर फिर्यादी यांना देवुन फिर्यादी यांचा मोबाईल नंबर घेतला त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मॅसेजेस व फोन करुन त्यांचेशी जवळीक साधुन तो आर्मीमध्ये ऑफिसर असल्याचे सांगुन तो आर्मीमध्ये असलेबाबत त्याचेकडे असलेले आर्मीच्या वर्दीतीतील फोटो , बनावट आयकार्ड दानवुन त्यांचे राहते घरी येवुन त्यांचे आई वडीलांचा विश्वास संपादन करुन खोटे बोलुन लग्न केले .

तसेच फिर्यादी यांचा भावास नोकरी नसल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या वडीलांना विश्वासात घेवुन फिर्यादी यांच्या भावास आर्मीमध्ये भरती करण्यासाठी ०२ लाख रुपये व त्यांचे गावातील तसेच आळंदी मधील इतर मुलांचा विश्वास संपादन करुन त्यांना आर्मीमध्ये भरती करुन देतो असे सांगुन त्यांचेकडुन एकुण ५० ते ६० लाख रुपये घेवुन त्याने फिर्यादी यांचा भाऊ यश व इतर काहीजणांना आर्मीमध्ये भरती झालेबाबत बनावट जॉईनींग लेटर देवुन फसवणुक करुन विश्वासघात केला आहे . दाखल गुन्हयाचा तपास श्रीमती अनिता हिवरकर पोलीस निरीक्षक गुन्हे या करीत असून सदर आरोपीचा कोणताही ठावठिकाणा तसेच चालू मोबाईल क्रमांक नसतानाही तो मुळ औरंगाबाद येथील असल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक श्री राजेश उसगावकर यांच्या नेतृत्वाखालील टिमने औरंगाबाद येथील तो यापूर्वी रहात असलेल्या आठ – दहा भाडयाच्या घरांचा शोध घेवुन त्यांचे घरमालक शेजारी यांचेकडे चौकशी करून तो सध्या ज्या मुलीसोबत रहात आहे त्या मुलीस शोधून सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास गुन्हयाचे कामी ताब्यात घेवुन पुणे येथे आणले असता त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचेकडुन आर्मीची वर्दी , आर्मीचे लोगो , मेडल्स , इतर आर्मीच्या वस्तु , बनावट जॉईनिंग लेटर , फिर्यादीचा भाऊ व इतर लोकांकडुन घेतलेलेल्या पैशांमधुन विकत घेतलेली फोर्ड कंपनीची चारचाकी गाडी व दोन टु व्हीलर गाडया असा एकुण ५,४१,००० / – रु . चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

तसेच त्याला मदत करणारा त्याचा साथिदार संजय ज्ञानबा शिंदे , रा.मु.पो.केडगाव , भुषणनगर , ता.जि.अहमदनगर याचा शोध घेवुन अटक करणेत आलेली आहे . (आरोपी योगेश दत्तु गायकवाड) याचेकडे अधिक तपास करता त्याने आर्मीमध्ये नोकरीला असल्याचे सांगुन लॉकडाउनचे कारण सांगून नातेवाईक , मित्रमंडळी , भटजींविना बंद खोलीत ०४ मुलींशी लग्न केल्याचे सांगत असुन एका बायकोला दोन मुले आहेत.तसेच आरोपी हा आणखीन ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपीने ४० ते ४५ मुलांकडुन आर्मीमध्ये नोकरीला लावतो असे सांगुन त्यांचेकडुन अंदाजे ५० लाख रूपये घेवुन त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणुक केली आहे.ज्या कोणा तरूण – तरुणींची अशा प्रकारची फसवणुक झाली आहे त्यांनी तात्काळ बिबवेवाडी पोलीस ठाणेशी संपर्क करावा .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री नामदेव चव्हाण साो , परिमंडळ ०५ चे पोलीस उपायुक्त मा.नम्रता पाटील मॅडम , वानवडी विभागाचे सहा.पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र गलांडे , बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनिल झावरे व पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री.राजेश चं . उसगांवकर , पोलीस नाईक तात्या देवकते , पोलीस अंमलदार अमित पुजारी , सतिश मोरे , तानाजी सागर , श्रीकांत कुलकर्णी , अतुल महांगडे , अमोल शितोळे , दिपक लोधा व राहुल कोठावळे यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *