खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात २ महीन्यापासून पाहीजे असलेला गुन्हेगार युनिट – ३ गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

– २३/०५/२०२१ खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात २ महीन्यापासून पाहीजे असलेला गुन्हेगार युनिट – ३ गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद दि २९ / ०३ / २०२१ रोजी हनुमान चौक दिलीप बराटे यांचे घराचे शेजारी रामनगर वारजे येथे भांडणातून परशूराम तात्या गायकवाङ रा . महात्मा फुले चौक रामनगर वारजे पुणे यांस आरोपींने गाडी अडवून गायकवाङ यांचेवर कोयत्याने वार करून मदतीला येत असलेल्या ‘ नागरीकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावून परीसरात दहशत निर्माण केली होती.सदर बाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ९३ / २०२१ भादवि कलम ३०७,३४१,३२३,५०४,५०६,३४ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , मपोकाक ३७ ( १ ) सह १३५ , क्रिमिनल अॅमेंटमेंट अॅक्ट क ७ अन्वये गुन्हा दाखल होता . त्यापैकी शेखर खवळे बाळु येणपुरे , सचिन हिरेमणी यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती . सदर गुन्ह्यात आरोपी उमेश मिसाळ हा गुन्हा दाखल झाले पासून सुमारे ०२ महिण्यापासून फरार होता . दि २३/५/२०२१ रोजी युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट ३ च्या हद्दीत रात्रगस्त करीत असताना पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यात ०२ महिण्यापासून फरार आरोपी उमेश मिसाळ हा पर्वती जनता वसाहत पुणे येथे आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरीष्ठांना माहीती देवून परवानगीने युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर पथकातील स्टाफसह बातमीप्रमाणे जावून नमूद आरोपीस ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव उमेश उर्फे दाद्या अशोक मिसाळ वय ३३ वर्षे रा दत्त मंदिरा मागे बापुजी बुवा चौक रामनगर वारजे पुणे असे असल्याचे सांगीतले.त्याचेकडे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास विश्वासात घेवून तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई करीता वारजे माळवाङी पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा.पोलीस आयुक्त्त गुन्हे श्रीनिवास घाङगे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे १ सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शेवाळे , पो.उप निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदारविल्सन डिसोझा , राजेंद्र झुंजूरके यांनी केली आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट -३ , पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *